मुंबई : केंद्राने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी रजा प्रवास सवलत (LTC) योजना वाढवली आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना जम्मू आणि काश्मीर, लडाख, ईशान्य प्रदेश आणि अंदमान आणि निकोबार बेटांना २६ सप्टेंबर २०२४ ते २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत भेट सरकारी खर्चावर देता येणार आहे . LTC योजना म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना विमानाने प्रवास करण्याची परवानगी सरकारकडून देण्यात येते परंतु त्यात कर्मचाऱ्यांना काही सरकारी अटीची पुर्तता करावी लागते. सरकारी कर्मचाऱ्यांना विमानसेवेत या योजनेमुळे सूट मिळते. दरवर्षी चार वेळा या योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना घेता येतो. केंद्र सरकारने काढलेल्या सूचनेनुसार, सर्व पात्र सरकारी कर्मचारी ईशान्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, अंदमान आणि निकोबार बेटे किंवा लडाखसाठी मधील प्रवास LTC मध्ये रूपांतरित करू शकतात. ज्या कर्मचाऱ्यांची मूळ गावे या प्रदेशांमध्ये आहेत ते इतर तीनपैकी कोणत्याही प्रदेशाला भेट देण्यासाठी LTC योजनेचा लाभ घेऊ शकतात. 'ज्या सरकारी नोकराचे मूळ गाव ईशान्य प्रदेशात आहे, जम्मू आणि काश्मीर, अंदमान आणि निकोबार आणि लडाख, त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी तीनपैकी कोणत्याही प्रदेशात कोणत्याही ठिकाणी भेट देण्यासाठी होम टाऊन एलटीसीचे रूपांतर करण्याची परवानगी दिली जाईल. सरकारी नोकरदारांना या प्रदेशांमध्ये विमानाने प्रवास करण्याची परवानगी देणारी ही योजना आता आणखी दोन वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. २६ सप्टेंबर २०२४ ते २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत योजना सुरु राहणार आहे. दस्तऐवजात या योजनेसाठी पात्रता निकष देखील दिले आहेत. कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) नुसार, ज्या सरकारी नोकरांचे मूळ गाव आणि मुख्यालय/पोस्टिंगचे ठिकाण त्याच ठिकाणी आहे ते एलटीसी सुविधेसाठी पात्र नाहीत. सरकारी नोकर, ज्यांचे मूळ गाव आणि मुख्यालय/पोस्टिंगचे ठिकाण समान आहे, त्यांना कोणत्याही होम टाऊन एलटीसीचे रुपांतरण करण्याची परवानगी नाही कारण ते होम टाऊन एलटीसी सुविधेसाठी पात्र नाहीत,' डीओपीटीने नमूद केले आहे. प्रवासाच्या व्यवस्थेसाठी, मेमोरँडममध्ये असे नमूद केले आहे की, विमानाने प्रवास करण्यास पात्र असलेले सरकारी कर्मचारी त्यांच्या मुख्यालयातून त्यांच्या हक्काच्या श्रेणीतील कोणत्याही विमान कंपनीद्वारे, लागू अटी व शर्तींच्या अधीन राहून या सवलतीचा लाभ घेऊ शकतात. डीओपीटी दस्तऐवजात अशा क्षेत्रांची यादी केली आहे जिथे अधिकार नसलेल्या कर्मचाऱ्यांना इकॉनॉमी क्लासमध्ये विमान प्रवासाची परवानगी आहे:
- कोलकाता/गुवाहाटी आणि ईशान्येकडील कोणत्याही ठिकाणादरम्यान.
- कोलकाता/चेन्नई/विशाखापट्टणम आणि पोर्ट ब्लेअर दरम्यान.
- दिल्ली/अमृतसर आणि जम्मू-काश्मीर/लडाखमधील कोणत्याही ठिकाणादरम्यान.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/a8O1syV
No comments:
Post a Comment