Breaking

Sunday, September 1, 2024

भारताला पाचव्या दिवशी सात पदकं जिंकण्याची संधी, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक https://ift.tt/T6WRhQS

पॅरिस : भारताने क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत पाच पदकं जिंकली आहेत. पण भारताला पाचव्या दिवशी आता अजून सात पदकं जिंकण्याची संधी असणार आहे. भारताला कोणत्या खेळांमध्ये ही सात पदकं जिंकता येऊ शकतात, याचे वेळापत्रक आता समोर आले आहे.

पॅरालिम्पिकमध्ये आज भारत

नेमबाजी

मिश्र २५ मीटर पिस्तूल (एसएच-१) - पात्रता फेरी - निहाल सिंग आणि अमिर अहमद भट - दु. १२.३० पासूनमिश्र २५ मीटर पिस्तूल (एसएच-१) - पात्रता फेरी रॅपिड - निहाल सिंग आणि अमिर अहमद भट - सायं. ४.३० पासूनअंतिम फेरी - रात्री ८.१५ पासून

ॲथलेटिक्स

पुरुष - थाळी फेक (एफ-५६) - अंतिम फेरी - योगेश कथुनिया - दु. १.३५ पासूनपुरुष - भाला फेक (एफ-६४) - अंतिम फेरी - संदीप संजय सरगर, सुमीत अंतिल, संदीप - रात्री १०.३० पासूनमहिला - थाळी फेक (एफ-५३) - अंतिम फेरी - कांचन लखानी - रात्री १०.३४ पासूनमहिला - ४०० मीटर धावणे (टी-२०) - पहिली फेरी - दीप्ती जीवनजी - रात्री ११.३४ पासून

तिरंदाजी

मिश्र सांघिक कम्पाउंड - उपांत्यपूर्व फेरी - रात्री ८.४० पासून

बॅडमिंटन

मिश्र दुहेरी (एसएच-६) - ब्राँझपदकाची लढत - सोलैमलई-सुमती - दु. १.४० नंतरपुरुष एकेरी (एसएल-३) - सुवर्णपदकाची लढत - नीतेशकुमार वि. बेथेल डॅनिएल (ब्रिटन) - दु. ३.३० पासून भारताने शुक्रवारी चार पदकं जिंकली होती. त्यानंतर शनिवारी भारताला एक पदक मिळाले. आता सोमवारी या स्पर्धेच पाचवा दिवस असणार आहे. या पाचव्या दिवशी भारताला सात पदकं जिंकता येऊ शकतात. यावेळी भारताला नेमबाजी, तिरंदाची आणि अॅथलेटीक्समध्ये पदक जिंकता येऊ शकतात. त्यामुळे आता भारत सोमवारी किती पदकं जिंकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कारण या सात पदकांसह भारत मेडल टॅलीमध्ये मोठी झेप घेऊ शकतो.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/Bo5Rfsc

No comments:

Post a Comment