Breaking

Sunday, September 1, 2024

धक्कादायक! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर भरचौकात गोळीबार, नंतर केला कोयत्याने सपासप वार https://ift.tt/YfMtaek

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे () माजी नगरसेवक यांच्यावर अंधाधुद गोळीबार करण्यात आला आहे. घटना काही वेळापूर्वी नानापेठ परिसरात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आधी परिसरातील लाईट घालवण्यात आली आणि त्यानंतर वनराज आंदेकर यांना एकट्याला गाठून त्यांचावर अंधाधुद गोळीबार करण्यात आला. काही कळण्याआधीच पुन्हा हल्लेखोरांनी त्यांचावर कोयत्याने सपासप वार केले अशी माहिती मिळत आहे. घटना घडताच प्रत्यक्षदर्शनी लोकांनी तातडीने वनराज आंदेकर यांना रुग्णालयात हलवले पण गोळीबारात अधिक रक्तस्त्राव झाल्याने आंदेकर यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येत आहे.

कसा घडला गुन्हा?

गोळीबार करून हल्लेखोरांनी केले अशी माहिती प्रकरणातील मिळत आहे. आधी परिसरातील आणि नानापेठ चौकातले लाईट आरोपींनी घालवले त्यानंतर वनराज आंदेकर यांना एकटा असल्याचे पाहून हल्लेखोरांनी हल्ला केला. काही कामानिमित्त आंदेकर नानापेठेत गेल्याची माहिती प्राप्त होत आहे. आंदेकर यांचा काही घरगुती कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी किंवा कार्यकर्ते नव्हते. हल्लेखोरांनी नेमकी हीच संधी साधून हल्ला केला. आधी बाइकवरुन आलेल्या तीन ते चार जणांनी वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीने केएम रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतू त्यांची प्राणज्योत मालवली. घटनेतील संशयित आरोपी म्हणून गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, तुषार आबा कदम अशी नावे समोर येत आहे. पोलीसांनी गुन्हा नोंदवत पुढील प्रक्रिया सुरु केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/3cvRtsF

No comments:

Post a Comment