Breaking

Sunday, September 1, 2024

रोहितला संघात स्थान न देता गौतम गंभीर यांनी निवडला ऑलटाईम वनडे संघ, कोण आहे सलामीवीर पाहा https://ift.tt/XBagOLt

नवी दिल्ली : भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रोहित शर्माला आपल्या ऑल टाईम वनडे संघात स्थान दिले नसल्याचे समोर आले आहे. रोहितला जर त्यांनी संधी दिली नाही, पण या संघात सलामीवीर म्हणून त्यांनी कोणाची निवड केली आहे, हे आता समोर आले आहे.गंभीर यांनी संघात रोहित शर्माला संधी दिली नसली तरी त्यांनी विराट कोहलीला मात्र स्थान दिले आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण गंभीर आणि कोहली यांच्यातील वाद सर्वांनीच पाहिला आहे. मैदानातच हे दोघे एकमेकांना भिडले होते. पण वनडे संघ निवडताना मात्र गंभीर यांनी कोहलीला संघात स्थान दिले आहे. त्यामुळे चाहत्यांना यावेळी आश्चर्याचा धक्का बसला आहे.गंभीर यांनी यावेळी संघ निवडताना काही गोष्टींचा विचार केला आहे. पण त्याचवेळी त्यांनी सलामीवीर म्हणून वीरेंद्र सेहवागची निवड केली आहे. त्याचबरोबर दुसरा सलामीवीर म्हणून त्यांनी आपलीच निवड केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चाहते आता गंभीर यांना पुन्हा ट्रोल करू शकतात. गंभीर यांनी तिसऱ्या स्थानावर यांची निवड केली आहे. कोणत्याही संघासाठी चौथे स्थान सर्वात महत्वाचे असते. या संघात गंभीर यांनी चौथे स्थान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला दिले आहे.विराट कोहलीला गंभीर यांनी यावेळी पाचवे स्थान दिले आहे. गंभीरचे जसे कोहलीबरोबर चांगले नाते नव्हते, तसेच तो महेंद्रसिंग धोनीबद्दलही बऱ्याचदा चांगलं बोलला नव्हता. पण गंभीरने यावेळी संघ निवडताना धोनीला मात्र आपल्या संघात स्थान दिले आहे. धोनीने आपल्या लाडक्या युवराज सिंगलाही या संघाच्या मधल्या फळीत स्थान दिले आहे. गंभीरने यावेळी संघात चार गोलंदाज ठेवले आहेत, ज्यामध्ये दोन फिरकीपटू आहेत.गंभीर यांनी यावेळी आपल्या संघात अनिल कुंबळे यांना स्थान दिले आहे, पण त्यांनी हरभजन सिंगला मात्र संधी दिलेली नाही. गंभीर यांनी कुंबळे यांच्याबरोबर आर. अश्विनला संधी दिली आहे. गंभीर यांनी यावेळी संघात दोन वेगवान गोलंदाज नेमले आहेत. या संघात गंभीरने इरफान पठाणला संधी दिली आहे. इरफानबरोबर त्यांनी झहीर खानची संघात निवड केली आहे.गौतम गंभीर यांनी निवडलेला ऑल टाइम वनडे संघ पुढील प्रमाणे - वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड, , , , , अनिल कुंबळे, आर. अश्विन, इरफान पठाण आणि .


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/pSwetky

No comments:

Post a Comment