Breaking

Wednesday, September 11, 2024

गणपतीची आरती केली, मित्र मेसवर जेवणाला गेले; विद्यार्थ्याने हॉस्टेल रुमवर घेतला टोकाचा निर्णय, फक्त दोन दिवसात असं काय घडले? https://ift.tt/ZLMlUfH

जळगाव (निलेश पाटील): कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांच्या वस्तीगृहात एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विद्यापीठमध्ये गणपतीची सायंकाळी आरती आटपून होस्टेलमधील मित्र जेवणाला गेले. तेव्हा प्रतीक गोरडे याने रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. बहिणाबाई विद्यापीठातील मुलांच्या वस्तीगृह क्रमांक तीन येथे अमरावती जिल्ह्यातील प्रतीक विजयराव गोरडे (वय 19, राहणार शिरसगाव कसबा तालुका चांदुरबाजार जिल्हा अमरावती) याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. प्रतीक गणपतीची आरती करून रूममध्ये मध्ये गेला. त्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने विद्यापीठात एकच खळबळ उडाली. प्रतीक गोरडे हा विद्यापीठांमध्ये मुलांचे वस्तीगृह क्रमाक तीन येथे खोली क्रमांक 447 येथे दोनच दिवसापूर्वी राहायला आला होता. तो विद्यापीठात बी टेकच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता. त्याच्या खोलीमध्ये पाच सहकारी होते. प्रतीक गोरडे याचे वडील शिरसगाव कसबा येथे मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी 11 सप्टेंबर रोजी मुलांनी वस्तीगृहात बसवलेल्या गणपती मंडळातील आरती केली त्यानंतर मुले जेवणासाठी मेसवर निघून गेली. रूममधील सहकारी मेसमधून जेवणावरून परतली त्यावेळेला प्रतीक गोरडे याच्या खोलीमध्ये आतून दरवाजा लावलेला दिसून आले. त्यावेळी काही तरुणांनी खिडकीची काच तोडून पाहिले तर प्रतीक याने गळफास घेतलेला होता. या वेळेला इतर विद्यार्थी धावून आले त्यांनी तात्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी विद्यापीठाच्या रुग्णवाहिकेत दाखल केले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.प्रतीक गोरडे हा दोनच दिवसांपूर्वी घरून विद्यापीठांमध्ये प्रथम वर्षाच्या शिक्षणासाठी आला होता. मात्र या दोनच दिवसात असे काय घडले की त्याने आत्महत्या केली. विद्यार्थ्यांकडून आत्महत्याबाबत माहिती घेतली. दरम्यान प्रतीक गोरडे याने आत्महत्या का केली याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेले नाही. पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/IhZ9qux

No comments:

Post a Comment