मुंबई/रत्नागिरी (प्रसाद रानडे): राहुल गांधी यांनी संधी येईल त्यावेळी आरक्षण रद्द करणार, असे अमेरिकेतून म्हटले आहे. यावर यांनी व त्यांच्या नेत्यांनी बोलावे, असा थेट निशाणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला आहे. इतकच नाही तर राहुल गांधी अमेरिकेत देशाची बदनामी करायला गेले आहेत. आता त्यांनी स्पष्टच सांगितलं संधी मिळाली की आरक्षण रद्द करणार आणि हे आम्ही तुमच्याच माध्यमातून ऐकलं आहे. संविधान बदलण्याची इच्छा ही राहुल गांधी यांचीच आहे. त्याच्याबद्दल आता उबाठाने बोलले पाहिजे. महाराष्ट्रमध्ये कुठच्याही गोष्टीच राजकारण करून त्याचा मतामध्ये उपयोग करून घ्यायचा ही फार चुकीची गोष्ट आहे, अशा शब्दात उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे.आरक्षण आम्ही कधी हटू देणार नाही हे आमच्या नेत्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी सांगितले. मग आता राहुल गांधीचे अमेरिकेत गेले आहेत. आम्ही संविधान बदलणार असे खोटे फेक नेरेटिव्ह सेट करून पण त्यातून काय मिळवले, असाही सवाल सामंत यांनी उपस्थित केला आहे. विरोधकांना सध्या कोणत्याही गोष्टीत राजकारण करायचे आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडी गार्ड याने केलेल्या मारहाणीसंदर्भात प्रश्न विचारता सामंत म्हणाले की, या संदर्भात थोरवे यांनी स्वतः खुलासा केला आहे. त्या गोष्टीबद्दल माझा काही संबंध नाही, असे ते म्हणाले आहेत असे असतानाही त्या विषयाचे राजकारण करायचं ही विरोधकांना सवय आहे, असे सामंत म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाने नागपूर येथे भरधाव कारने उडवल्याप्रकरणी बोलताना सामंत म्हणाले की, याबाबत पोलीस तपास करत आहेत इतकच नाही तर बावनकुळे यांनीही कायद्याच्या कचाट्यातून कोणीही सुटणार नाही. कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. आणि आता निष्पन्न झाल असेल काँग्रेसचे नेत्याचा मुलगा आहे तर मग याचा खुलासा काँग्रेसने करावा. शिवसेनेकडून महाराष्ट्रातील कौटुंबिक भेटीचे नियोजनआमच्या आजची मुंबईतील बैठक ही संघटनात्मक पातळीवर चर्चा करण्यासाठी होती जागा वाटपासंदर्भात नव्हती असेही पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. ज्या आमच्या विविध योजना आहेत महायुतीच्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लॉन्च झाले आहेत त्या कशा पद्धतीने संघटनेने तळागाळापर्यंत पोहोचवायच्या घराघरापर्यंत कशा न्यायच्या याचे नियोजन आज आम्ही केले आहे. मुख्यमंत्र्यांचा कालपासून कौटुंबिक भेटीचा दौरा सुरू झाला आहे. या संदर्भातलं महाराष्ट्रातलं नियोजन आम्ही करत आहोत आणि हा नियोजनाचा आराखडा आम्ही मुख्यमंत्र्यांना आजच दाखवू आणि त्यांच्या एप्रूव्हल नंतर हा कार्यक्रम महाराष्ट्रभरात सुरू होईल, अशी ही माहिती यावेळी सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री महोदय सर्वसामान्य बहिणीच्या घरी जाऊन त्याला कशा पद्धतीने या योजनेचा फायदा मिळतो आहे हे पाहत आहेत काही त्रुटी आहेत का या संदर्भात ते स्वतः जाऊन चर्चा करत असतील तर मुख्यमंत्री हे कॉमन मॅन आहेत हे देखील सिद्ध झाले आहे. आणि आता हा दौरा महाराष्ट्रात पालकमंत्र्यांनी शिवसेनेच्या काय करायचं कशा पद्धतीने महायुतीला पुढे न्यायचं याचे नियोजन आजच्या बैठकीत आम्ही ठरवलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/lRF2zcN
No comments:
Post a Comment