Breaking

Tuesday, September 17, 2024

... बाप्पा म्हणाले 'तुम्ही करू शकता'; विसर्जनावेळी देशमुखांच्या सुनांना आला खास अनुभव; जिनिलियाने शेअर केला Video https://ift.tt/KsTyJ7X

मुंबई: अवघ्या राज्यभरात १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचा उत्साह पाहायला मिळाला. एकीकडे बाप्पाला त्याच्या गावी पाठवण्याचा जोश, तर दुसरीकडे त्याला निरोप देताना मनाची होत असलेली घालमेल, अशा संमिश्र भावना दरवर्षी आजच्या दिवशी पाहायला मिळतात. अवघ्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम हे १० दिवस असते आणि अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनाबरोबरच घरच्या बाप्पांनाही या दिवशी निरोप दिला जातो. अनेक सेलिब्रिटींनी यानिमित्ताने काही पोस्ट शेअर केल्या आहेत. अभिनेत्री जिनिलिया देशमुखनेही तिच्या जाऊबाऊ यांच्यासोबत घरच्या बाप्पाला निरोप दिला. तिने सोशल मीडियावर खास अनुभव शेअर केला आहे. देशमुखांच्या घरी सर्वच सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. जिनिलिया मुळची महाराष्ट्रातील नसली तरी ती मराठी संस्कृती जपत या सणांमध्ये उत्साहाने सहभागी होती. होळी, आषाढी एकादशी, वटपौर्णिमा या निमित्ताने तिचे अनेक फोटो-व्हिडिओ समोर आले आहेत. आता गणेशोत्सवही देशमुखांच्या घरी धुमधडाक्यात साजरा झाला. त्यानंतर देशमुखांच्या बाप्पाच्या विसर्जनादरम्यानचे काही व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये दिसते आहे की, जिनिलिया आणि तिच्या मोठ्या जाऊबाई अदिती देशमुख यांनी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करुन, मूर्ती स्वत: उचलली आणि विसर्जनासाठी निघालेल्या गाडीमध्ये ठेवली. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', अशा जयघोषात बाप्पांना निरोप देण्यात आला. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये व्हिडिओ शेअर करताना जिनिलियाने दिलेले कॅप्शनही खूप खास आहे. जिनिलियाने असे म्हटले की, 'दरवर्षी विसर्जनाच्या दिवशी मूर्ती उचलताना आम्हाला प्रचंड दडपण यायचं, त्यामुळे आम्ही तसा कधी प्रयत्न केला नव्हता. पण, यावर्षी अदिती वहिनी आणि मला बाप्पाचा आवाज ऐकू आला 'तुम्ही करू शकता' आणि बाप्पामुळे हे शक्य झालं. गणपती बाप्पा मोरया! दीपशिखा मिस यू.' अदिती यांनीही जिनिलियासोबतचे हे क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याशिवाय जिनिलियाने स्टोरीमध्ये आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये देशमुखांच्या घरातील बच्चेकंपनी बाप्पाची आरती करत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने असे लिहिले आहे की, 'मिस यू रितेश.' विसर्जनादिवशीच्या कोणत्याच व्हिडिओमध्ये रितेश दिसला नाही, त्यामुळेच जिनिलियाने त्याची आठवण काढल्याचे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/8CxqIke

No comments:

Post a Comment