परभणी, डॉ.धनाजी चव्हाण : जिंतूर तालुक्यातील चांदज गावातील गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान करपरा नदीच्या पात्रात एक छोटा मुलगा वाहून गेला आहे. गणपती मूर्तीच्या विसर्जनासाठी तो नदीपात्रात आला होता. भागवत कल्याण अंभोरे वय तेरा वर्षे असे या लहान मुलाचे नाव आहे. याविषयी विस्तृत माहिती अशी की आज अनंत चतुर्थी निमित्त गणेश विसर्जन उत्सव मोठ्या उत्साहात चालू होता. यावर्षी पाऊस चांगला पडल्याने सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहेत. जिंतूर तालुक्यातील चांदज या गावाशेजारीहून करपरा नदी वाहते. आज दुपारपासूनच मूर्ती विसर्जनासाठी सर्वच नागरिक आपल्या आपल्या परिसरातील नदी विहिरी मध्ये बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन करत आहेत. चांदज गावातील बहुतांश गणेश मूर्ती याच करपरा नदीपात्रामध्ये विसर्जित केल्या जात होत्या. चांदत गावातील तेरा वर्षीय भागवत कल्याण अंभोरे हा मुलगा आपल्या मित्रांसोबत गणेश मूर्ती विसर्जनासाठी करपरा नदी पात्राकडे गेला होता. नदीपात्रातून पाण्याचा प्रवाह चांगलाच वाहत होता. पण गणपती विसर्जनाचे आकर्षण त्यामुळे भागवत अंभोरे हा गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी नदीपात्रामध्ये दूरवर गेला. आणि तो गणेश मूर्ती सोबत तसाच वाहून गेला. वाहून गेल्यानंतर त्याच्या सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर भागवत अंभोरेचा शोध घेण्याचा उपस्थित नागरिकांनी प्रयत्न केला. पण भागवत अंभोरे या लहान मुलाचा थांगपत्ता लागलाच नाही. सायंकाळच्या सुमारास आपला मुलगा बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी करपरा नदीपात्रात गेले असल्याचे घरच्यांना कळाले. तोपर्यंत तो वाहून गेल्याची खबर गावामध्ये सर्वत्र पसरली होती. उत्साहात सुरू असलेल्या बाप्पांचा विसर्जनाचा सोहळा दुःखामध्ये बदलून गेला. भागवत अंभोरे या १३ वर्षीय मुलगा वाहून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. त्याचा शोध घेण्यासाठी सध्या नदीपात्रामध्ये सर्वत्र शोधाशोध केली जात आहे. मंगळवारी सांयकाळी बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी मुलाने नदीच्या पात्रात पाऊल ठेवले त्यावेळीच पाण्याच्या प्रवाहात मुलगा वाहून गेला. कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी मुलाचं शोध सुरू केला. नदीकाठावरील अनेक गावांमधून मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती अद्याप मुलाचा थांगपत्ता लागला नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/NCHUjBw
No comments:
Post a Comment