Breaking

Friday, October 4, 2024

किवी फळ शेतीने शेतकऱ्यांचे नशीब चमकवलं, वर्षाला करताय लाखोंची कमाई https://ift.tt/3lV1KFn

शिमला : हिमाचल प्रदेशातील शेतकरी आता बागायती पिकांच्या लागवडीत अधिक रस घेत आहेत. टोमॅटो, सिमला मिरची, सोयाबीन, वाटाणे, आले, लसूण या नगदी पिकांच्या लागवडीतून येथील शेतकरी चांगले उत्पन्न घेत आहेत. विशेषत: सिरमौर जिल्ह्यातील पच्छड भागात शेतकरी मोठ्या प्रमाणावर किवीची लागवड करत आहेत. येथील शेतकरी किवीपासून वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. त्यामुळेच पच्छाद परिसरात किवीचे क्षेत्र 16 हेक्टरपर्यंत वाढले आहे.नरग उप-तहसीलच्या थलेडी गावातील प्रगतशील शेतकरी विजेंद्र सिंह ठाकूर मोठ्या प्रमाणावर किवीची लागवड करत आहेत. ठाकूर यांनी 1990 च्या दशकात एलिसन आणि हेवर्ड जातींची 100 रोपे लावून किवी शेती सुरू केली. चार वर्षांनंतर त्यांनी आपल्या बागेत आणखी 50 रोपे लावली. ते म्हणाले की,चालू वर्षी मी माझ्या बागेतून सुमारे 50 क्विंटल किवीचे उत्पादन घेतले, ज्यातून मला सुमारे 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

1993 मध्ये किवी लागवडीला सुरुवात झाली

मुख्यमंत्री किवी प्रोत्साहन योजनेंतर्गत 100 किवी रोपे लावण्यासाठी राज्य सरकारकडून 1.6 लाख रुपयांचे अनुदान मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. ठाकूर यांच्या कुटुंबात 6 लोक आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब शेती आणि बागायती व्यवसायाशी संबंधित आहे. त्यांनी दोन मजूरही ठेवले आहेत. किवी व्यतिरिक्त, ते टोमॅटो, शिमला मिरची, मटार आणि लसूण याची देखील शेती करतात. पुढे जावून नरेंद्र पवार नावाच्या प्रगतशील शेतकऱ्यासोबत शेती सुरू केली. नरेंद्र पवार हे विजेंद्रसिंह ठाकूर यांच्यासारखेच प्रगतशील शेतकरी आहेत. 1993 मध्ये त्यांनी किवीची शेती सुरू केली. तेही पच्छादचे रहिवासी आहेत. त्यांनी नौनी येथील डॉ. वाय.एस. परमार फलोत्पादन आणि वनीकरण विद्यापीठातून 150 किवी रोपे विकत घेतली आणि विद्यापीठाकडून किवी लागवडीचे बारकावे शिकून घेतले. सध्या पवार यांच्या बागेत 300 किवीची झाडे आहेत आणि त्यांनी यावर्षी सुमारे 90 क्विंटल फळांचे उत्पादन घेतले आहे, ज्यामुळे त्यांना 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे.

6,000 फूट उंचीवर शेती केली जाते

मुख्यमंत्री किवी प्रोत्साहन योजनेंतर्गत सरकार किवी शेतीला प्रोत्साहन देत असल्याचे शेतकरी नरेंद्र पवार यांनी सांगितले आहे. बेरोजगार तरुणांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे. सध्या पच्छाद परिसरात 16 हेक्टरमध्ये किवीची लागवड केली जात असून, त्यातून वर्षाला सुमारे 133 मेट्रिक टन फळांचे उत्पादन होते. किवी शेती 4,000 ते 6,000 फूट उंचीच्या भागात केली जाते. किवीच्या लोकप्रिय जातींमध्ये ॲलिसन, ब्रुनो, मॉन्टी, ॲबॉट आणि हेवर्ड यांचा समावेश आहे.

किवी खाण्याचे अनेक फायदे

पच्छादचे फलोत्पादन विकास अधिकारी राजेश शर्मा म्हणाले की, या भागातील हवामान किवी लागवडीसाठी योग्य आहे. मुख्यमंत्री किवी प्रोत्साहन योजनेअंतर्गत सरकार किवी शेतीला सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे. या उपक्रमाचा बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा. किवी हे फळ रक्तातील प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी आणि ॲनिमियाशी लढण्यासाठी ओळखले जाते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/v2B4WKh

No comments:

Post a Comment