Breaking

Friday, October 4, 2024

Thane Traffic : पीएम मोदींच्या दौऱ्यामुळे ठाण्यातील काही प्रमुख मार्गाच्या वाहतुकीत बदल https://ift.tt/LIc2Wl6

मुंबई : ऐन विधानसभेच्या तोंडावर पीएम नरेंद्र मोदी यांचे राज्यातील दौरे वाढले आहेत. अशातच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी शनिवारी ठाण्यातील कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. यावेळी ते ३३ हजार कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ऑनलाइन भूमिपूजन आणि उद्धाटन करणार आहेत. यावेळी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या महिला लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार सोहळा होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी संपूर्ण ठाणे शहर सज्ज झाले असून, प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सभेच्या दृष्टीने घोडबंदर रोडवर वाहतूक बदल करण्यात आले असून वालावलकर सभा मैदान ‘रेड झोन’ घोषित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एसपीजी झेड प्लस सुरक्षा असल्यामुळे आज, ५ ऑक्टोबर रोजी वालावलकर सभा मैदान, बोरीवडे गाव, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे (प.) हा परिसर तात्पुरता ‘रेड झोन’ घोषित करण्यात आला आहे. याभागातील वाहतूक सुद्धा वळवण्यात आली आणि मार्ग बंद करण्यात आले आहे. ठाणे ते घोडबंदर मार्गावरील रस्ता, डि-मार्ट ते टायटन हॉस्पिटल, घोडबंदर ठाणे वाहिनी सर्व्हिस रोड, ओवळा ते वाघबीळ नाका इथे नो पार्किंग असेल तसेच हा मार्ग एकाच बाजूने वाहतुकीसाठी सुरु असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाण्यातील सभेमध्ये राज्यातील पहिली भूमिगत मेट्रो - कुलाबा-वांद्रे-सीप्झ : मुंबई मेट्रो मार्गिका - ३ टप्पा-१ (आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानक) शुभारंभ, ठाणे शहरांतर्गत वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन, पूर्वमुक्त मार्ग विस्तार छेडानगर, घाटकोपर ते आनंदनगर, ठाणे प्रकल्पाचे भूमिपूजन, नैनानगर रचना परियोजनांतर्गत विविध पायाभूत सुविधा कामांचे भूमिपूजन, ठाणे महापालिकेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन, ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक सत्कार, असे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/JgQLdz5

No comments:

Post a Comment