Breaking

Thursday, October 3, 2024

फिनालेच्या उंबरठ्यावरून येऊन या सदस्याला मोठा धक्का, हा स्पर्धक बिग बॉस मराठी ५च्या खेळातून बाहेर https://ift.tt/6d39aPb

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या ग्रँड फिनालेला दोन दिवसच बाकी राहिले आहे. सर्व रसिक आतुरतेने फिनालेची वाट पाहात आहेत. बिग बॉसचे स्पर्धक ता निवांत झाले असली त्यांच्या मनातली धाकधुक मात्र वाढली आहे. घरात सगळेच एकमेकांशी गप्पा मारताना दिसले.अंकिता आणि डीपी दादा बाथरुम बसले असताना, अभिजीत त्या दोघांना म्हणतो, तुम्ही दोघे असे शांत आणि एकटे का बसले आहात? तुम्हाला असं वाटतं की, तुम्ही दोघे एकटे आहात आणि बाकी घर एकत्र झाले."त्यावर अंकीता म्हणाली," आम्ही दोघे बसले आहोत तर एकटे कसे झालो. तुम्ही लोक तुमचे काही तरी बोलत असता तर त्याच्या मध्ये आम्ही काय बोलणार येऊन? उगचा आम्ही येणार काही बोलणार आणि ते आमच्यावरच येणार. त्यापेक्षा शांत ठीक आहे.त्यावर डीपी दादा म्हणाले, "पाहिला आठवडा कसा होता तसं झालं आहे. कसं बसायचं? कसं बोलायचं?अभिजीत त्या दोघांनसोबत बोलत होता नंतर तो निघून गेला. त्याचवेळी निक्की तिथं येऊन म्हणाली," अभिजीत इथं होता ना? " त्यावर अंकीता म्हणाली,"हिंमत लागते. तू आलीस ना म्हणून गेला. जा जाऊन दे थोडी हिंमत. त्याला हिंमतीची गरज आहे "त्यानतंर निक्की बाहेर येऊन अभिजीतला म्हणाली," तू तिथे बोलत होतास ना? बाहेर का आलास. ते लोक बोलत आहेत तुला थोडी हिंमत द्यायला. त्यांनी जर क्रॉस प्रश्न विचारले तर तुला उत्तर द्यायला जमलं नाही तर. "अंकिता डीपी दादांनी म्हणाली," आता पर्यंतच्या गेममध्ये अभिजीतने कधी प्लॅनिंग केली नाही आणि त्याला आपला गेम विक दिसत आहे." 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळाली आहे. आजचा भाग फुल ऑन एन्टरटेनमेंटचा ठरला.सर्वच सदस्य आज त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कल्ला करताना दिसून आले. पण घरातील गोलीगत सूरज चव्हाणचा जलवा वेगळाच होता. "काठी न्‌ घोंगडी घेऊन द्या की", या गाण्यावर सूरज आपल्या स्टाईलनं थिरकताना दिसला. सूरजच्या साधेपणानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आज घरात तो चांगलाच धुमाकूळ घालताना दिसला.एलिमिनेशनची उत्सुकता...तर निक्की, अभिजीत आणि धनंजय पोवार हे फायनलिस्ट म्हणून निवडले गेले. त्यानंतर जान्हवी देखील सेफ झाली. तर , वर्षा उसगांवकर आणि अंकिता वालावलकर हे डेंजर झोनमध्ये होते. नंतर सूरज चव्हाणही सेफ झाला. शेवटी अंकिता आणि वर्षा डेंजर झोनमध्ये होते. बिग बॉसनं सूरजला झापुक झुपुक शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर बिग बॉसनं वर्षा उसगांवकर यांचं नाव घेत त्यांचा प्रवास संपल्याचं सांगितलं. अंकिता सेफ झाली.हे ठरले टॉप सहा स्पर्धकअंकिता,निक्की ,अभिजीत, धनंजय पोवार आणि सूरज , जान्हवी हे स्पर्धक टॉप सहा स्पर्धक ठरले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/nwq0fIu

No comments:

Post a Comment