Breaking

Saturday, October 26, 2024

पराभवानंतर रोहित शर्मा हा विराट कोहलीला भेटला आणि त्यानंतर काय केलं पाहा व्हिडिओ... https://ift.tt/G9UhqZm

पुणे : भारताच्या दुसऱ्या कसोटीत पराभव झाला. या कसोटी सामन्यात कोहली सपशेल अपयशी. पण हा सामना झाल्यावर रोहित हा विराटला भेटला आणि त्यानंतर नेमकं काय केलं, याचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. यावेळी रोहितबरोबर भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीरही असल्याचे पाहायला मिळत आहे.ही गोष्ट घडली जेव्हा भारताने हा सामना गमावला. भारतीय संघाचा पराभव झाला. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या संघाबरोबर हस्तांदोलन करण्यासाठी आले होते. त्यानंतर भारतीय संघ आपल्या ड्रेसिंग रुमच्या दिशेने जाण्यासाठी निघाला. रोहित शर्मा यावेळी पहिला होता आणि त्याच्या मागोमाग गौतम गंभीर येत होते. रोहित शर्मा समोर भारतीय संघातील राखीव खेळाडू येत होते. त्यावेळी विराट हा पहिलाच होता. विराट कोहलीजवळ रोहित शर्मा आला. रोहितने त्याला हात मिळवला आणि आलिंगन दिले. पण गंभीर यांनी फक्त काही सेकंदात विराटला हात मिळवला आणि ते निघून गेले. त्यामुळे रोहित शर्माचे कौतुक यावेळी होत आहे. कारण विराट कोहली अपयशी ठरला तरी एका अनुभवी खेळाडूला रोहित शर्मा किती मान देतो, रोहित शर्मा किती प्रेमाने वागवतो, हे यावेळी सर्वांनाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले.लोकेश राहुलला पहिल्या कसोटीत संधी दिली होती. पण त्यानंतर दुसऱ्या कसोटीत मात्र त्याला वगळण्यात आले. कारण दुसऱ्या कसोटीपूर्वी शुभमन गिल फिट झाला होता. दुसरीकडे सर्फराझ खानने पहिल्या कसोटीक दीड शतक साकारले होते. त्यामुळे तो चांगल्या फॉर्मात असल्यामुळे त्याला संघाबाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे पुण्यातील दुसऱ्या कसोटीमधून लोकेश राहुलला संघाबाहेर करण्यात आले. पण या सामन्यात भारताचा पराभव झाला.लोकेश राहुलला संघाबाहेर केले ते सर्फराझ खान फॉर्मात होता म्हणून, पण आता सर्फराझही दुसऱ्या कसोटीत अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी आता सर्फराझला संधी मिळते की राहुलला, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे. कारण तिसरी कसोटी ही मुंबईत होणार आहे आणि मुंबई हे सर्फराझ खानचे घरचे मैदान आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/6h1VuA7

No comments:

Post a Comment