नवी दिल्ली : महाविकास आघाडीत अद्याप काही जागांवर तिढा कायम असल्याने या जागांसाठी दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयात खलबतं सुरु झाली आहेत. काँग्रेस पक्षाकडून पहिली यादी जाहीर झाली असून त्यामध्ये ४८ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर काही जागांवर शिवसेनेने आडमुठेपणाची भूमिका घेतल्याने मविआतील अंतर्गत राजकारण तापले आहे. काँग्रेस मुख्यालयात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल, प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले आणि राज्यातील काही अन्य वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सीईसी बैठक पार पडली आहे. मात्र बैठकीदरम्यान राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत राहुल गांधी बैठकीतून बाहेर पडल्याची बातमी समोर आली आहे. विधानसभेचा रणसंग्राम सुरु झाला असून राज्यात पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी मविआतील प्रमुख नेते जोर लावताना दिसत आहेत. पण जागावाटपात घोडे अडल्याचे चित्र दिसत आहे. नामांकन अर्ज दाखल कऱण्यासाठी केवळ चार दिवसांचा अवधी राहिल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तिढा सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु दिल्लीत सुरु असलेल्या सीईसीच्या बैठकीत काँग्रेसच्या बैठकीत मात्र राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे, मुंबई आणि विदर्भातील जागा उद्धव ठाकरेंना सोडल्यामुळे राहुल गांधी नाराज असल्याचे समजते.कांग्रेस नेत्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या वाटाघाटी करताना योग्य भूमिका पार पाडली नाही, असे म्हणत राहुल गांधी नाराज होऊन सीईसी बैठकीतून बाहेर पडले. राहुल गांधींना राज्यातील नेत्यांची भूमिका रुचली नसल्याचे यावरुन समजत आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ज्येष्ठ नेत्याला जागावाटपासाठी चर्चा करण्यासाठी पाठविले होते. चर्चेअंती विदर्भ आणि मुंबईतील काही जागा शिवसेना उबाठाला सोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधींनी यावर नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/uVXl90f
No comments:
Post a Comment