Breaking

Tuesday, October 15, 2024

भारताची पहिली कसोटी किती वाजता व कुठे पाहता येणार, पावसाचा अंदाज, सर्व माहिती एका क्लिकवर https://ift.tt/u5lU7iW

विनायक राणे : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना काही तासांवर आला आहे. पण हा सामना किती वाजता सुरु होणार, कुठे पाहता येणार, पावसाची शक्यता किती आहे, ही सर्व माहिती आता फक्त एकाच क्लिकवर वाचायला मिळू शकते.

पावसाचा पाच दिवसांचा अंदाज

पहिला दिवस, बुधवार : पावसाचा अंदाज ४१%, वादळी वाऱ्यांची शक्यता २५%दुसरा दिवस, गुरुवार : पावसाची अंदाज ४०%, वादळी वाऱ्यांची शक्यता २४%तिसरा दिवस, शुक्रवार : पावासाचा अंदाज ६७%, वादळी वाऱ्यांची शक्यता २७%चौथा दिवस, शनिवारी : पावसाचा अंदाज २५%, वादळी वाऱ्यांची शक्यता नाहीपाचवा दिवस, रविवारी : पावसाचा अंदाज ४०%, वादळी वाऱ्यांची शक्यता २४%

गौतम गंभीर काय म्हणाले...

‘बांगलादेशचे आव्हान वेगळे होते आणि न्यूझीलंडचे वेगळे असेल. किवींच्या गोटात टीम इंडियाला आव्हान देऊ शकतील अशा खेळाडूंचा भरणा आहे. ते सहज हार मानत नाहीत. आम्हालाही असे प्रतिस्पर्धी भावतात. मात्र भारतीय संघ कुणालाच घाबरत नाही’ असे भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सांगितले.

दृष्टिक्षेप

-२०१२मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा १-२ असा पराभव. त्यानंतर भारताकडून मायदेशात सलग १८ मालिकाविजयांची नोंद-या ५३ कसोटींत फक्त चार पराभव आणि सात सामने अनिर्णित-काही आठवड्यांपूर्वी भारताकडून बांगलादेशचा ०-२ असा धुव्वा

गिल, जयस्वाल सावध रहा!

-जयस्वाल, गिल धावांचा ओघ कायम राखण्यास उत्सुक-विराट, रोहित कारकिर्दीच्या उत्तरार्धात असून त्यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी या दोघांवर-गेल्या दहा डावांत गिलची तीन शतके आणि दोन अर्धशतके-जयस्वालचे गेल्या आठ डावांत एक द्विशतक आणि पाच अर्धशतके-वेगवान माऱ्याला सामोरे जाताना गिलच्या फलंदाजीत अजूनही सुधारणेस वाव-जयस्वालनेही वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळ उंचावण्याची आवश्यकता-गेल्या २० डावांत १२वेळा जयस्वाल वेगवान गोलंदाजांचा शिकार-ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधी गिल आणि जयस्वालकडून या चुकांची दुरुस्ती होणे आवश्यक-रोहित-विराट सर्वोत्तम कामगिरी करत नसल्याने गिल, जयस्वालने न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्यांचा जबाबदारीने सामना करणे अपेक्षित

विराट-रोहितकडून कामगिरी कधी?

रोहितने गेल्या १५ कसोटींत दोन शतके आणि एक अर्धशतक केले आहे. हे सोडल्यास १३ डावांत त्याला ४९७ धावाच करता आल्या आहेत. विराटही धावांच्या दुष्काळातून जात आहे. गेल्या सहा डावांत दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ४६, तर बांगलादेशविरुद्धची ४७ धावांची खेळी त्याची सर्वोत्तम खेळी आहे. न्यूझीलंडचे अजाझ पटेल आणि राचिन रवींद्र हे गोलंदाज विराटसाठी याआधीही डोकेदुखी ठरलेले आहेत.

पहिली कसोटी आजपासून

ठिकाण : एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरूप्रक्षेपण : सकाळी ९.३० पासून जिओ सिनेमा, स्पोर्ट्स १८वर आमने-सामने : ६२ कसोटींत भारताचे २२-१३ असे वर्चस्व. २७ कसोटी अनिर्णित हवामानाचा अंदाज : पावसाच्या व्यत्ययाची सर्वाधिक शक्यता. ढगाळ वातावरणही असेल, त्यामुळे चहापानानंतर विद्युतझोतातील खेळ अपेक्षित. खेळपट्टीचा अंदाज : तज्ज्ञांच्या मते खेळपट्टी समतोल, तरीही फिरकी गोलंदाजांचा वरचष्मा राहण्याची शक्यता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/huDYZ4U

No comments:

Post a Comment