Breaking

Tuesday, October 15, 2024

टोल माफीचा निर्णय त्या ३१ जागांवरील नुकसान टाळण्यासाठी- काँग्रेसचा आरोप https://ift.tt/LrnEFik

मिरा-भाईंदर (भाविक पाटील)टोलच्या मुद्यावर नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी असली तरी त्याकडे मागील वर्ष दुर्लक्ष करण्यात आले होते. यामुळे मोठे नुकसान येत्या निवडणुकीत महायुतीच्या मुंबई व उपनगरातील ३१ जागांवर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ह्या भीतीपोटी जाग आलेल्या राज्य सरकारकडून आता टोल माफीचा निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोप प्रदेश यांनी केला आहे. ते मिरा-भाईंदर मध्ये बोलत होते.राज्य सरकारने टोल माफीचा निर्णय घेतल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हा दिलासा कधीपर्यंत असेल ? हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. टोलवसुली करणाऱ्या कंपनीला बँकेच्या जप्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागू नये, म्हणून राज्य सरकारकडून ८०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या समस्येचे समाधान करण्यासाठी करण्यात आली की जनतेच्या कररुपी पैशातून एखाद्या कंपनीचे कर्ज भागवण्याकरता करण्यात आली ? असा सवाल आता उपस्थित होत असल्याचे हुसैन म्हणाले . निवडणुकांच्या तोंडावर सरकारकडून एकामागून एक मोफत च्या घोषणा केल्या जात आहेत. येत्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागणार म्हणून ही कार्यपद्धती अवलंबली जात आहे. मात्र, त्यांनी लावलेले विविध गोष्टींवरील जीएसटी जनता विसरलेली नाही. गरीब कुटूंब दहा हजार रुपये कमवत असल्यास त्यांना तब्बल दीड हजार रुपये हा विविध स्वरूपातून जीएसटी कर भरावा लागत आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. ह्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत देशभरात पाहायला मिळाला असे देखील ते म्हणाले. सरकारच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार व महिलांवरील वाढते अत्याचार, घोटाळे आदींची अनेक प्रकरणे घडली आहेत. ह्याचा पंचनामा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. हा पंचनामा राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत विविध माध्यमातून पोहचवला जाणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले असून महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात मतदान होईल आणि निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/IYkHFZ4

No comments:

Post a Comment