मुंबई : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे राज्यातील उमेदवार निश्चित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक पार पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्य मंत्री आणि पक्षाचे प्रमुख जेपी नड्डा यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभेसाठी २८८ जागावर येत्या २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. येत्या २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने मंगळवारी झारखंड निवडणुकीसंदर्भात बैठक घेतली. झारखंडमध्ये १३ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबरला दोन टप्प्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर आज महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी बैठक पार पडली आहे. आता महायुतीच्या जागावाटपाबाबत आधीच अमित शाहा यांच्या अध्यक्षतेखाली अनेक बैठका पार पडल्या आहेत. आज होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्र निवडणुकीतील प्रमुख प्रतिस्पर्धी सत्ताधाऱ्यांची महाविकास आघाडी आहे. तर महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे. महाविकास आघाडी ज्यामध्ये शिवसेना (UBT), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधात असलेल्या महाविकास आघाडीने चांगली कामगिरी करत राज्यातील ४८ पैकी ३१ जागा मिळवल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विधानसभेसाठी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने चंग बांधला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडून महायुतीची सत्ता जावू नये, यासाठी दिल्लीतून आता विशेष नियोजन करण्यात येत आहे.निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. याव्यतिरिक्त, १५ राज्यांमधील ४८ विधानसभेच्या जागा आणि लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली. याचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. यामध्ये राज्यातील नांदेडच्या एका लोकसभा जागेचा सुद्धा समावेश आहे. महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा सामना आगामी एक महिन्यात राज्यात पाहायला मिळेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/JGNPl1j
No comments:
Post a Comment