Breaking

Thursday, October 10, 2024

८.५ दक्षलक्ष झाडांची कत्तल करुन उभारणार ग्रेट निकोबार प्रकल्प; काँग्रेसकडून कडाडून विरोध https://ift.tt/y8HZaRQ

नवी दिल्ली : यांनी ग्रेट निकोबार प्रकल्पावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. पर्यावरण मंत्रालयाचा ८.५ लाख झाडे तोडल्याचा दावा अत्यंत कमी सांगण्यात आला आहे. रमेश यांनी सांगितले की, द ७२,000 कोटी रुपयांचा एक व्यापक विकास उपक्रम आहे. बेटावर एक बंदर, आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्मार्ट सिटी आणि ऊर्जा प्रकल्प तयार करण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे सुमारे १० लाख झाडांची कत्तल होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेत कोणताही अहंकार किंवा प्रतिष्ठा मध्ये न आणता प्रकल्प थांबवणे हाच एकमेव योग्य पर्याय उपलब्ध होतोय. वृक्षतोडीच्या मुद्द्यावर, माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर एक मीडिया रिपोर्ट शेअर केला, ज्यामध्ये सरकारच्या दाव्यावर जयराम रमेश यांनी प्रकाश टाकला होता की, केवळ ५०% वनक्षेत्र साफ केले जाईल, जे अंदाजे ६ हजार ५०० हेक्टर आहे. ८.५ लाख झाडे तोडली जातील पण आमचा अंदाज आहे की, या प्रकल्पासाठी ३.२ दशलक्ष ते ५.८ दशलक्ष झाडे तोडावी लागतील. ग्रेट निकोबार प्रकल्प पर्यावरणीय समतोल गंभीरपणे धोक्यात आणत असल्याचे जयराम रमेश यांनी सातत्याने सांगितले आहे. या संदर्भात त्यांनी यापूर्वी पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहिले होते. रमेश यांनी प्रकल्पाची विश्वासार्हता, रचना आणि निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून प्रकल्पाला दिलेल्या पर्यावरणीय मंजुरीचा पुनर्विचार करण्यासाठी उच्च-स्तरीय समिती (HPC) स्थापन करण्याची मागणी केली होती.२०२१ मध्ये मोदी सरकारने सुरू केलेला ग्रेट निकोबार प्रकल्प, निकोबार बेटाच्या दक्षिणेकडील आणि सर्वात मोठ्या भागासाठी एक प्रमुख विकास योजना आहे. भारताच्या मुख्य भूभागाच्या पूर्वेस सुमारे १८०० किलोमीटर अंतरावर स्थित, बेट बंगालच्या उपसागरात ९१० चौरस किलोमीटर पसरले आहे. यामध्ये इंदिरा पॉइंटचा समावेश आहे. इंडोनेशियन बेट समुद्रापासून फक्त १७० किलोमीटर अंतरावर आहे.प्रकल्प अंदमान आणि निकोबार बेटांच्या सर्वात दूरच्या कोपऱ्यांपर्यंत विस्तारित करण्यासाठी डिझाइन केला आहे, ज्यामध्ये एक कार्गो पोर्ट, एक आंतरराष्ट्रीय विमानतळ, एक स्मार्ट सिटी आणि ४५० -मेगावॅट गॅस आणि सौर ऊर्जा प्रकल्प यांचा समावेश आहे. तथापि, समीक्षकांचा असा युक्तिवाद आहे की पर्यावरणाची किंमत प्रकल्पापेक्षा खूप जास्त आहे. जवळपास १० लाख झाडे तोडली जाण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे पर्यावरणाला महत्त्वपूर्ण धोका निर्माण होवू शकतो.पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून या प्रकल्पाला पुढे नेणे वाजवी असू शकत नाही यावर त्यांनी भर दिला आहे. अहंकाराला बळी न पडता किंवा प्रतिष्ठेच्या चिंतेला बळी न पडता निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. पर्यावरणावर होणारे परिणाम लक्षात घेऊन प्रकल्प थांबवणे हाच पुढे जाण्याचा योग्य मार्ग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/6WMa0Dt

No comments:

Post a Comment