बेंगळुरू : मागील काही वर्षांपासून , ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. क्यूआर कोड, एखाद्या लिंकवर क्लिक करुन अनेकांची आतापर्यंत लाखोंची फसवणूक झाली आहे. असाच एक प्रकार समोर आला असून एका व्यक्तीची तब्बल २१ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका ४० वर्षीय व्यक्तीने एका अॅपवर रजिस्टर्ड केलं आणि त्यानंतर त्याची मोठी फसवणूक झाली.
काय आहे नेमकं प्रकरण?
एका ४० वर्षीय व्यक्तीचा घटस्फोट झाला होता. नव्या जोडीदाराच्या शोधासाठी त्याने डेटिंग अॅपवर रजिस्टर्ड केलं. या अॅपवर या व्यक्तीची एप्रिल महिन्यात एका महिलेशी मैत्री झाली. त्या महिलेनेही आपल्या डेटिंग अॅपच्या प्रॉफाईलवर घटस्फोटीत असल्याचं लिहिलं होतं. ती महिला या व्यक्तीप्रमाणेच डेटिंग ऍपवर तिच्यासाठी जोडीदाराचा शोध घेत असल्याची बतावणी तिने केली होती. दोघांची अॅपवर ओळख झाली आणि पुढे मैत्री झाली.२१ लाखांचं कर्ज घेतलं आणि...
मैत्रीनंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. दोघांमध्ये बोलणं सुरू असताना त्या व्यक्तीने महिलेला तो नोकरीच्या शोधात असल्याचं सांगितल. महिलेने त्याला फॉरेक्स ट्रेडिंगमधे उतरण्याचा सल्ला दिला. तीदेखील यातूनच ती चांगले पैसे कमावत असल्याचं तिने सांगितलं. त्या महिलेच्या बोलण्यात येऊन व्यक्तीने २१ लाखाचं कर्ज घेतलं आणि नंतर ते २१ लाख एक ब्रोकरेज फर्ममधे भरले. त्या महिलेनेच त्याला या फर्मची माहिती देत यात पैसे गुंतवण्याचं सांगितलं होतं. तिने स्वतःही याच फर्ममधे पैसे गुंतवले असल्याचं त्या व्यक्तीला सांगितलं.पैसे घेतल्यानंतर महिलेकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
व्यक्तीने कर्ज काढून ते २१ लाख रुपये महिलेने सांगितल्याप्रमाणे फर्ममध्ये गुंतवले. काही दिवासांन तो व्यक्ती पैशांबाबत विचारणा करू लागला. मात्र त्या महिलेने किंवा ब्रोकरेज फर्मनेही कॉल उचलणं, रिप्लाय करण बंद केलं. त्यानंतर व्यक्तीला त्याची मोठी फसवणूक झाल्याचं समजलं. नंतर त्याने संपूर्ण घटनेची माहिती पोलिसात दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. माहिती तंत्रज्ञान कायदा आणि बीएनएस कलम ३१८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून असून याप्रकारणी पुढील तपास सुरु आहे. .from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/U8jHEGn
No comments:
Post a Comment