मुंबई: न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यासाठी निवड समितीने १५ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघात कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील १६ खेळाडूंच्या संघातील यश दयाल याला फक्त बाहेर ठेवण्यात आले आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असेलल्या उपकर्णधारपदी जसप्रीत बुमराहची निवड करण्यात आली आहे. असा आहे भारतीय संघरोहित शर्मा(कर्णधार), (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव झुरेल, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १६ ऑक्टोबरपासून सुरूवात होईल. पहिली कसोटी १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान बेंगळुरू येथे होणार आहे. दुसरी कोसटी २४ ते २८ ऑक्टोबर या काळात पुण्यात होईल. तर तिसरी आणि अंतिम कसोटी १ ते ५ नोव्हेंबर या काळात मुंबईत होणार आहे. सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने २-० असा विजय मिळवला होता. दुसऱ्या कसोटीत दोन दिवस पावसामुळे खेळ झाला नव्हता तरी टीम इंडियाने आक्रमक क्रिकेट खेळत बांगलादेशचा पराभव केला होता. दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड संघ नुकताच श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाऊन आला आहे. दोन्ही संघात झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा २-० असा पराभव झाला होता. पहिल्या कसोटीत श्रीलंकेने ६३ धावांनी तर दुसऱ्या कसोटीत एक डाव आणि १५४ धावांनी धमाकेदार विजय मिळवला होता. श्रीलंकेतील या कामिगरीमुळे भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा संघ दबावाखाली असेल. घरच्या मैदानावर टीम इंडियाने गेल्या अनेक वर्षात कसोटी मालिका गमावलेली नाही. दोन्ही संघातील ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपचा भाग आहे. WTCच्या गुणतक्त्यात भारत सध्या अव्वल स्थानी आहे. टीम इंडियाने ११ पैकी ८ कसोटीत विजय मिळवला असून भारताचे ९८ गुण असून विजयाची टक्केवारी ७४.२४ अशी आहे. तर न्यूझीलंडचा संघ गुणतक्त्यात सहाव्या स्थानावर असून त्यांनी ८ पैकी ३ कसोटी जिंकल्या आहेत. न्यूझीलंडची विजयाची टक्केवारी ३७.५० इतकी आहे. पहिल्या WTCचे विजेतेपद मिळवणाऱ्या न्यूझीलंड यावेळी अंतिम लढतीत पोहोचण्याची शक्यता जवळ जवळ संपुष्ठात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/i7uBTMI
No comments:
Post a Comment