रत्नागिरी : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे भरारी पथक तसेच विविध पथकांची करडी नजर आहे. या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेटींग ॲप कॉईन जप्त करण्यात आहे. सुमारे तीन लाख रुपये किमतीचे कॉईन जप्त करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या एका कारवाईत मुंबई गोवा महामार्गावरती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाकडून वाहनांची तपासणी सुरू असताना दोन संशयित वाहनांमधून तब्बल 87 लाख 93 हजार 960 रुपयांची गोवा बनावटीची दारू सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.ऑनलाइन बेटिंग साठी वापरले जाणारे ॲपचे कॉइन २६५-चिपळूण विधानसभा मतदार संघात ही मोठी कारवाई झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर येथील SST पथकाने ऑनलाइन आचारसंहिता अनुषंगाने ही कारवाई केली आहे. ऑनलाइन बेटिंग साठी वापरले जाणारे ॲप चे कॉइन मिळाले आहेत. देवरूख पोलीस स्टेशनमध्ये जप्तीच्या अनुषंगाने कारवाई सुरू असून त्यांची अंदाजे किंमत ३ लाखापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता ऐन विधानसभा निवडणुकीत करण्यात आलेली कारवाई कोणत्या प्रकारच्या बेटिंगसाठी कॉइन वापरली जाणार होती या सगळ्याचा तपास पोलीस करत आहेत.
मुंबई गोवा महालगाव दोन संशयास्पद गाड्या
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात चालणारे अवैध धंदे यांच्याविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी येथील पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार 26 ऑक्टोबर रोजी रात्रौ पासुन महामार्गावर पेट्रोलींग करुन वाहनाची तपासणी करीत होते. याच दरम्यान 27 रोजी मुंबई गोवा महामार्गावर खानु गावातील ब्राम्हणवाडी या ठिकाणी दोन चारचाकी गाड्या उभ्या असल्याच्या दिसल्या. या गाड्यांचा संशय आल्याने त्यांच्या जवळ जावून त्यात असलेल्या इसमांकडे चौकशी करुन दोन्ही गाडयांची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटी दारुचे बॉक्स होते. याप्रकरणी सदर दोन्ही गाडीचे चालक १) अक्षय चंद्रशेखर घाडीगांवकर, वय २९, रा. मालवण, जि. सिंधुदुर्ग व २) विजय प्रभाकर तेली, वय ३२, रा. कणकवली, जि. सिंधुदुर्ग यांचे ताब्यातुन रु. ८७,९३,७६० /- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन रत्नागिरी ग्रामिण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक, रत्नागिरी व अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली नितीन ढेरे, पोलीस निरीक्षक स्थागुअशा रत्नागिरी, पोऊनि श्री. गावडे, पांडुरंग गोरे, सुभाष भागणे, नितीन डोमणे, बाळू पालकर, शांताराम झोरे, विक्रम पाटील अमित कदम, विवेक रसाळ, भैरवनाथ सवाईराम, प्रविण खांबे, गणेश सावंत, सत्यजित दरेकर, अतुल कांबळे, दत्तात्रय कांबळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा रत्नागिरी यांनी केली आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/qUMZuS8
No comments:
Post a Comment