रत्नागिरी (प्रसाद रानडे): अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच मतदारसंघातून भाजपाकडून माजी आमदार याच मतदारसंघातून गेले वर्षभर तयारी करत होते आणि आता अशातच ही जागा बेंडल यांना देण्यात आली आहे. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंत बाईत व काही पदाधिकारी उपस्थित होते मात्र विनय नातू यांची अनुपस्थिती होती. माजी आमदार विनय नातू यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर यशवंत बाईत यांनी मोठे वक्तव्य केले ते म्हणाले की, कुणीही नाराज नाही सगळे काम करणार आहोत आणि आमचा पक्ष हा व्यक्ती निष्ठेवर चालणारा नाही पक्षनिष्ठेवर चालतो मी भाजपचा गेली कित्येक जुना पदाधिकारी कार्यकर्ता आहे. आम्ही सगळे बरोबर आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत काही वर्षे चाललेली ही दादागिरी या निवडणुकीत आम्ही मोडून काढण्यात आम्ही यशस्वी होऊ असाही टोला त्यांनी भास्कर जाधव यांचं नाव न घेता लगावला आहे.वीस वर्षात कोणाला जमलं नाही ते महायुतीने करून दाखवलं- मंत्री गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राजेश बेंडल यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी गुहागर येथे दाखल केला आहे. यावेळी झालेल्या सभेत मंत्री उदय सामंत म्हणाले की, या मतदारसंघाला तात्यासाहेब नातू यांचा वारसा आहे रामभाऊ बेंडल यांचा वारसा आहे. जिल्ह्याचे नेतृत्व शामराव पेजे यांनी केले आहे. या जिल्ह्याला पूर्वी राजापूर पासून खेडपर्यंत सहा ते सात कुणबी समाजाचे आमदार होते. मात्र दुर्दैवाने गेल्या वीस वर्षात कुणबी समाजातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचे धाडस आजपर्यंत कोणी केले नव्हते. मात्र महायुतीने हे करून दाखवलं याबद्दल मला महायुतीचा सार्थ अभिमान आहे, असे गौरवउद्गार सामंत यांनी व्यक्त केले. 1961 नंतर काँग्रेसच्या राजवटीमध्ये तिलोरी कुणबी मधला तिलोरी हा शब्द निघून गेला होता. तुमची पन्नास वर्षाची मागणी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन महायुतीच्या सरकारने मान्य केली व आम्ही कुणबी जातीसमोर तिलोरी हा शब्द लावण्यात यशस्वी झालो, अशी माहिती सामंत यांनी दिली. बेंडल यांच्यासारख सर्वसामान्य घरातील कुटुंब सगळ्या जाती-धर्मांनी उचलून धरत त्यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले. राजेश बेंडल यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार या तिन्ही नेत्यांचे आशीर्वाद आहेत, असेही सामंत यांनी यावेळी अधोरेखित केले. यावेळी शिवसेना, भाजपा, आरपीआय तसेच बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.राजेश बेंडल यांनी यावेळी सांगितले की, इतक्या कमी वेळात इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत यातच विधानसभेतील यश सामावले आहे. या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर भाजपचे माजी आमदार विनय नातू यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याजवळ संपर्क होऊ शकला नाही
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/CiesKUX
No comments:
Post a Comment