जळगाव, निलेश पाटील : राष्ट्रवादीचा प्रचार करत नसून स्वतःच्या फॅमिलीचा प्रचार करत आहे. एकनाथ खडसेंचं दुसरं नाव म्हणजे भुलथापा, खडसे म्हणजे आता जोक झाला आहे अशी टीका मुक्ताईनगरचे आमदार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. एकनाथराव खडसे यांनी मध्यंतरी प्रसार माध्यमांसमोर राज्य सरकारवर टीका करताना सांगितले होते की, या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर जनतेला प्रलोभन देऊन भूलथापा देण्याचे काम केले आहे. लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारला कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसा शिल्लक राहणार नाही असे खडसे यांनी सांगितले होते. यावर आज चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की खडसे हेच मोठे भूलथापा आहे. एकनाथ खडसे यांचे दुसरे नाव म्हणजे भूलथापा असल्याची जहरी टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.यावेळी पाटील पुढे बोलताना म्हणाले की, खडसे म्हणजे काय खडसे जोक झाला आहे. आता खडसे सकाळी कोणत्या पक्षात, दुपारी कोणत्या पक्षात, संध्याकाळी कोणता पक्ष, एकाच घरातले तीन जण एकत्र बसून निर्णय घेतात, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केलीय. खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासाठी काम करत नसून ते स्वतःच्या मुलीसाठी काम करत आहेत. पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात जाऊन सर्व काही त्यांच्या फार्महाऊसवरून सुरू आहे. राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय कुठेही नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. एकंदरीतच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळं मुक्ताईनगरचे वातावरण चांगलंच तापलं आहे.खासदार यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून आता प्रत्येक घरात घुसत आहे आणि हात जोडून मतदान मागत आहे. अभि नही तो कभी नही अशी परिस्थिती खडसेंची झाली आहे. चिन्हाच्या माणसाचं कुठेच कार्यालय त्यांचं नाही कुठे जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख नाही पक्षासाठी त्यांनी कधीही काम केले नाही. स्वतःच्या परिवारासाठी त्यांनी काम केलं अशी टीका ही आमदार पाटील यांनी केली.तसेच यावेळी एकनाथ शिंदे जो मला निर्णय देतील तो मला मान्य राहील एकनाथ शिंदे माझे नेते आहेत. मुक्ताईनगरची जागा ही भाजपाने मागितली आहे. अशा चर्चा सुरू आहे. प्रत्येक पक्षाला त्यांचं संघटन वाढवण्याचा स्वतंत्र आहे. त्यामुळे त्यांनी जागेची मागणी केली असावी अशी चर्चा आहे. आणि मी अपक्ष म्हणून निवडून आलेलो आहे मी कोणत्याही चिन्हावरती निवडणूक लढवली नव्हती. अशीही माहिती त्यांनी प्रसार माध्यमांसमोर पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/qBnAu4l
No comments:
Post a Comment