म. टा. प्रतिनिधी, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद स्थानकादरम्यान कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. शुक्रवार-शनिवार आणि शनिवार-रविवारदरम्यान मध्यरात्री ३ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. ब्लॉकमुळे सीएसएमटी ते भायखळादरम्यान धीमा-जलद अप -डाउन आणि सीएसएमटी ते वडाळा रोडदरम्यान अप-डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. ब्लॉकमुळे शेवटच्या लोकल वेळांमध्ये बदल करण्यात आले आहे. दरम्यान पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.रात्रकालीन ब्लॉकस्थानक - सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोडमार्ग - अप आणि डाउन धीमा-जलदवेळ - शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.३० ते रविवारी पहाटे ३.३०परिणाम - ब्लॉक वेळेत सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड धीमा-जलद मार्गावरील अप-डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. रात्री उशिरा धावणाऱ्या मुख्य मार्गावरील काही लोकल भायखळा स्थानकात आणि हार्बर मार्गावरील लोकल वडाळा रोड स्थानकात रद्द करून त्याच ठिकाणाहून चालवण्यात येणार आहेत.ब्लॉकमुळे शेवटच्या आणि पहिल्या लोकल फेऱ्यामुख्य मार्ग- शनिवारी शेवटची लोकल रात्री १२.१२ सीएसएमटी-कर्जत- रविवारी पहिली लोकल पहाटे ४.३५ खोपोली-सीएसएमटी- रविवारी पहाटे पहिली लोकल३.२३ कल्याण-सीएसएमटी हार्बर मार्ग- शनिवारी शेवटची लोकल मध्यरात्रीनंतर १२.१३ सीएसएमटी-पनवेल- रविवारी पहिली लोकल पहाटे ४.५२ सीएसएमटी-पनवेल- शनिवारी रात्री १०.४६ पनवेल-सीएसएमटी- रविवारी पहिली लोकल पहाटे ४.१७ वांद्रे-सीएसएमटीअखेरचे स्थानक दादर असणाऱ्या मेल-एक्स्प्रेस- १२८७० हावडा-सीएसएमटी- १२०५२ मडगाव-सीएसएमटी- ११०५८ अमृतसर-सीएसएमटी- २२१२० मडगाव-सीएसएमटी लोकलचा डबा घसरला; मध्य रेल्वेवर खोळंबाकल्याण: टिटवाळ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलचा शेवटचा डबा रेल्वे रुळांवरून घसरल्याची घटना शुक्रवारी रात्री शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकानजीक घडली. सुदैवाने यावेळी लोकलचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. रेल्वेच्या तांत्रिक विभागाने तातडीने धाव घेत घसरलेला रेल्वेचा डबा रुळांवर आणण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र हे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/zVv6Efc
No comments:
Post a Comment