नवी दिल्ली: यांनी लोकसभेतील विरोधीपक्ष नेते यांनी केलेल्या विधानावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी असे म्हणाले होते की, आता विरोधीपक्ष न्यायालयाचे काम करत आहे. गांधींच्या या वक्तव्यावर चंद्रचूड म्हणाले की, न्यायपालिकेचे काम कायद्यांची तपासणी करायचे आहे. ते विरोधीपक्षाचे काम करत नाही. लोकशाहीत विरोधीपक्ष आणि न्यायपालिका या दोघांच्या स्वतंत्र भूमिका आहेत. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत माजी सरन्यायाधीश यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर आक्षेप घेतला. न्यायालयाचे काम कायदे तपासण्याचे आहे. त्यांचे काम संसद किंवा विधानसभांमधील विरोधीपक्षाचे नाही. लोकांना अनेकदा असा गैरसमज होतो की न्यायालयांनी विरोधी पक्षाचे काम केले पाहिजे. पण असे नाही. लोकशाहीत विरोधीपक्ष आणि न्यायालये या दोघांचे स्थान वेगवेगळे आहे. यावर बोलताना चंद्रचूड पुढे म्हणाले, काही लोक न्यायालयाचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी करतात. ते न्यायपालिकेच्या खांद्यांवर बंदूक ठेवून चालवतात. न्यायालयाला राजकीय विरोधीपक्षाचा अड्डा करण्याचा प्रयत्न केला जातो. काय म्हणाले होते राहुल गांधीआम्ही माध्यमे, तपास यंत्रणा आणि न्यायपालिका यांच्यावतीने एकटेच काम करत आहोत. हे भारतातील वास्तव आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर चंद्रचूड यांनी थेट कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण ते म्हणाले की मला या मुद्द्यावर कोणताही वाद घालायचा नाही. पंतप्रधान मोदींची भेटजेव्हापासून पंतप्रधान मोदींनी चंद्रचूड यांची घरी भेट घेतली तेव्हापासून सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. याबद्दल विचारले असता ते म्हणाले- अनेक वेळा तुम्ही विरोधीपक्षांच्या नेत्यासोबत चर्चा करता. कधी कधी कायदेशीर गरज असते. एखाद्या पदाची नियुक्ती, एखाद्या समितीची नियुक्ती यात पंतप्रधान, सरन्यायाधीश, विरोधीपक्ष नेता देखील असतात. या बैठकीनंतर तुम्ही १० मिनिटे चहा घेता. त्यात क्रिकेटपासून चित्रपटांपर्यंत सर्व गोष्टींवर चर्चा होते. गणोशोत्सवाच्या काळात मोदींनी त्यांची घरी भेट घेतली. यावर बोलताना चंद्रचूड म्हणाले, या आधी देोखील पंतप्रधान सामाजिक कार्यक्रमासाठी न्यायाधीशांच्या घरी गेले आहेत. मला वाटते आम्ही जे काम केले आहे ते पाहावे. कामाच्या आधारावर मु्ल्यमापन करावे. ती भेट एक सामाजिक होती. त्यात काहीच वेगळे असे नव्हते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/OgmYEca
No comments:
Post a Comment