मुंबई : अर्जुन तेंडुलकरबाबत आयपीएलच्या लिलावात गोंधळ उडाला होता. पण त्याला मुंबई इंडियन्सने अखेर आपल्या संघात दाखल केला. पण लिलावानंतर अर्जुन तेंडुलकरमध्ये कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळेच आता अर्जुन तेंडुलकरला मोठा फटका बसलेला आहे.
अर्जुन सुरुवातीला ठरला होता UNSOLD
आयपीएलच्या लिलावात सुरुवातीला जेव्हा अर्जुनचे नाव पुकारण्यात आले तेव्हा त्याला कोणीही वाली ठरला नव्हता. कारण अर्जुनचे नाव पुकारल्यावर त्याच्यावर कोणीही बोली लावण्यास इच्छुक नसल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे अर्जुनवर कोणीही बोली लावली नाही आणि तो UNSOLD ठरला होता.अर्जुनवर कोणीही बोली का लावली नव्हती...
लिलाव हा रविवारी सुरु झाला. पण शनिवारी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत अर्जुन खेळला होता. अर्जुन गोव्याच्या संघाकडून खेळत होता आणि त्यांचा सामना मुंबईच्या संघाबरोबर होता. या सामन्यात अर्जुनने चार षटके टाकली होती. या चार षटकांत मुंबईच्या फलंदाजांनी तब्बल ४८ धावांची लूट केली होती. त्यामुळे अर्जुनवर कोणीही बोली लावली नव्हती.अर्जुनला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात कसे काय घेतले...
अर्जुन आयपीएलच्या लिलावात सुरुवातीला अनसोल्ड ठरला होता. पण त्यानंतर सर्व अससोल्ड खेळाडूंची नावं पुन्हा लिलावात पुकारली गेली होती. त्यावेळी मुंबई इंडियन्सने अर्जुनला संघात स्थान दिले. मुंबईने अर्जुनला ३० लाख या बेस प्राइजवरच संघात घेतले.अर्जुन लिलावानंतर सुधारला नाही, नेमकं काय घडलं पाहा....
अर्जुन लिलावानंतर बुधवारी म्हणजेच २७ नोव्हेंबरला पुन्हा एकदा सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळायला उतरला. यावेळी अर्जुनच्या गोव्याचा सामना हा आंध्र प्रदेशविरुद्ध होता. यावेळी अर्जुनला आपली चार षटकेही पूर्ण करता आले नाहीत आणि त्याच्यावर नामुष्की ओढवली. कारण त्याच्याच षटकात आंध्र प्रदेशने विजय साकारला. अर्जुनने या सामन्यात ३.४ षटकेच गोलंदाजी केली. यावेळी अर्जुनने ३६ धावा आंध्र प्रदेशच्या फलंदाजांना दिल्या. गोव्याला या सामन्यात मोठा पराभव पत्कराला लागलाच, पण त्यांच्या संघाचा हा सलग तिसरा पराभव होता. त्यामुळे अर्जुनवर पुन्हा एकदा गोलंदाजी करताना नामुष्कीची वेळ आल्याचे पाहायला मिळाले.अर्जुन तेंडुलकर आता आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळणार आहे. त्यावेळी सर्वात महत्वाचे म्हणजे त्याला संधी मिळते का आणि संधी मिळाल्यावर तो कशी कामगिरी करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष नक्कीच लागलेले असणार आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/txfhLdq
No comments:
Post a Comment