Breaking

Monday, November 11, 2024

ऐन निवडणुकीत पैशांची चणचण, भाजपच्या उमेदवाराने केले मदतीचे आवाहन; बँकेचा खातेनंबर शेअर केला https://ift.tt/2zsDFPE

(विजयसिंह होलम): विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. या निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याच्या शक्यता आधीपासूनच व्यक्त केल्या जात होत्या. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी रोकड आणि सोनेही पकडले गेले. काही ठिकाणी उमेदवार एकमेकांवर धनशक्तीचा वापर होत असल्याचे आरोप करीत आहेत. अशा परिस्थितीत कर्जत-जामखेडमधील भाजपचे उमेदवार यांनी मात्र आपल्याला पैशाची चणचण भासत असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी मतदारांनात आर्थिक मदतीचे आवाहन करून आपला बँकेचा खातेनंबरही जाहीर केला आहे. शिंदे यांच्या या कृतीची मतदारसंघात आता चर्चा सुरू झाली आहे.कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार (विधान परिषद) राम शिंदे यांच्यात लढत होत आहे. या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आता प्रचार शिगेला पोहोचला असताना शिंदे यांनी सोशल मीडियात पोस्ट करून आपल्याला आर्थिक मदतीची गरज असल्याचे म्हटले आहे. मला आर्थिक पाठबळाची गरज असून माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी माझ्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने आर्थिक मदत करून सहकार्य करावे, असे शिंदे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. कर्जत जामखेडमध्ये या दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पक्षांतरेही होत आहेत. भाजमधील काहींना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. कर्जतमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा प्रवेश झाला. पक्षाने या मतदारसंघात समन्वयक म्हणून भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रा. भानुदास बेरड यांची नियुक्ती केली आहे.या निवडणुकीत शिंदे यांनी प्रचारात भूमिपूत्र विरूद्ध बाहेरचा उमेदवार यावर जोर दिला आहे. पवार यांच्याकडून बारामतीची यंत्रणा कर्जत-जामखेडमध्ये वापरली जात असल्याचा आरोप शिंदे करीत आहेत. आपण सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असून प्रस्थापितांविरूद्ध लढा देत असल्याचेही शिंदे सांगतात. भाजपचे वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिंदे नीकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या प्रचारासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्याही सभा होत आहेत. अशातच आता शिंदे यांना आर्थिक मदतीची आवाहन केल्याने त्याची वेगळी चर्चाही सुरू झाली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/gC364E0

No comments:

Post a Comment