Breaking

Sunday, November 10, 2024

कराडजवळ ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हचा थरार; दोन महिला ठार, तर एक गंभीर जखमी https://ift.tt/0lomjKJ

सातारा (संतोष शिराळे) : पुणे- बेंगळुरू आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रज जवळील कोर्टी गावाजवळ सर्व्हिस रोडवर ड्रंक अँड ड्राइव्हचा थरार घडला. या घटनेत क्रेनचालकाने दुचाकीस धडक दिल्याने दोन महिला ठार झाल्या, तर तेरा वर्षीय आर्या परदेशी ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिला कराड येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. रुक्मिणी परदेशी (वय ३५), गायत्री परदेशी ( वय १८) या दोघी जागीच ठार झाल्या आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले, साताऱ्याहून कराडकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर क्रेन चालकाने एका दुचाकीस व रिक्षास जोराची धडक दिली. यामध्ये रिक्षा पलटी झाली, तर दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला. या घटनेतील दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन महिला ठार झाल्या, तर एक अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाले आहे. ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. गंभीर जखमी अल्पवयीन मुलीस कराड येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. रुक्मिणी परदेशी (वय ३५), गायत्री परदेशी ( वय १८) या दोघी जागी ठार झाल्या, तर आर्या परदेशी (वय १३) ही अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेची माहिती उंब्रज पोलीस ठाण्यात समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ग्रामस्थही मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. ग्रामस्थांनी जखमींना उपचारासाठी तातडीने कराड येथे रुग्णालयात दाखल केले. यावेळी ग्रामस्थांनी क्रेन चालकासह मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत जमलेल्या ग्रामस्थांनी महामार्ग रोखला. त्यामुळे काहीकाळ वातावरण तणावाचे झाले होते. महामार्ग रोखल्यामुळे सुमारे पाऊणतास वाहतूक विस्कळीत झाली होती. उंब्रज पोलिसांनी जमावला शांत करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, सातारा- पंढरपूर महामार्गावर म्हसवडजवळ वाण्याची झाडी या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात आटपाडी तालुक्यातील शिक्षिका जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी सांगितले, की आटपाडी एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले रामचंद्र निवृत्ती देशमुख व त्यांच्या पत्नी जयश्री रामचंद्र देशमुख हे पुण्यावरून घरी परतत होते. म्हसवडजवळ आल्यावर रामचंद्र देशमुख यांना गाडी चालवत असताना डुलकी लागल्याने गाडीने रस्ता सोडून संरक्षण कठड्याच्या पत्र्याला जोरदार धडक दिली. त्यावेळी तो पत्रा गाडीत घुसून जयश्री देशमुख यांच्या पोटात घुसला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती रामचंद्र देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर तात्काळ रुग्णवाहिकेला पाचारण करून दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/0DLOfsn

No comments:

Post a Comment