मुंबई- आणि यांनी आपल्या कर्तृत्वाने इंडस्ट्रीत ठसा उमटवला. त्यांनी त्यांच्या काळात खूप नाव व प्रसिद्धी मिळवली. स्मिता पाटील यांचा इंडस्ट्रीतील प्रवास खूपच छोटा होता पण खूप गाजला. स्मिता आणि राज बब्बर यांना सिनेइंस्ट्रीत जितके यश मिळाले तितके यश त्यांचा मुलगा प्रतीक बब्बरला मिळाले नाही. प्रतिक बब्बर अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. पण त्याला हवी तशी ओळख मिळाली नाही. एकतर प्रतीकचे चित्रपट चालले नाहीत आणि ज्या चित्रपटात काम केले त्यात प्रतीक सहाय्यक भूमिकेत दिसतो. जेव्हा आईची सावली निघून गेली प्रतिकची आई आणि अभिनेत्री स्मिता पाटील यांचे वयाच्या ३१ व्या वर्षी निधन झाले. प्रतीकला जन्म दिल्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी स्मिता पाटील यांनी हे जग सोडले. बाळंतपणाच्या काही कॉम्प्लिकेशनमुळे त्यांचा मृत्यू झाला. लहानपणीच आईचे छत्र हरपल्याची सल प्रतीकच्या मनात अजूनही आहे. मध्यंतरी दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपले दु:ख व्यक्त केले. तो म्हणाला की,"माझ्या आईमध्ये तिच्या व्यक्तिरेखेशी भावनिकरित्या जोडण्याची क्षमता होती. तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत सत्यता आणली." "तिचा अभिनय केवळ अभिनयापुरता नव्हता, तर तिने साकारलेल्या व्यक्तिरेखेचे जीवन जगण्या प्रयत्न होता. तिची कलेबद्दलची प्रामाणिकता आणि समर्पण आजही प्रेक्षकांच्या मनात गुंजत आहे." आई गमावल्याबद्दल दुःख व्यक्त करताना प्रतीक पुढे म्हणाला, "दुर्दैवाने मला तिला भेटण्याची आणि तिची जादू अनुभवण्याची संधी मिळाली नाही. तिने आयुष्यात निर्माण केलेल्या कलेतूनच मी तिला अनुभवू शकलो. तिच्याकडे इतर लोकांच्या नजरेतून जग पाहण्याचा एक अद्भुत मार्ग होता, जो तिच्या कामगिरीमध्ये आणि जीवनात दिसून आला."आईचे छप्पर हरपल्यामुळे प्रतीक जसजसा मोठा होतं होता तसं तसा तो वाईट मार्गाला लागलेला. वयाच्या १३ व्या वर्षी तो ड्रग्सच्या अधीन झाला. मात्र त्याने स्वत:वर मेहनत घेतली आहे. त्यानंतर तो यातून बाहेर पडू शकला. प्रतीकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर त्याने सान्या सागरशी लग्न केले. हे लग्न फार काळ टिकले नाही. २०१९ मध्ये त्यांनी लग्न केले आणि २०२३ मध्ये वेगळे झाले. आता तो प्रिया बॅनर्जीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अभिनेता प्रतीक बब्बरने जाने तू...या जाने ना, धोबी घाट, दम मारो दम, आरक्षण, माय फ्रेंड पिंटो, एक दीवाना था, उर्मिका, बागी २, मुल्क, मित्रों, छिछोरे, याराम, दरबार, द पॉवर, मुंबई सागा, बच्चन पांडे, इंडिया लॉकडाउन, यांसारखे चित्रपट केले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/kuZ6qlV
No comments:
Post a Comment