पर्थ : भारताचा कर्णधार रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाच्या संसदेत भाषण करण्याचा मान मिळाला. रोहित शर्माने यावेळी या संधीचे सोने केले. कारण रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या संसदेत असे भाषण केले केली, त्याने सर्वांची मनं जिंकून घेतली. रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियाच्या संसदेतील भाषण आता चांगलेच व्हायरल झाले आहे. रोहित शर्माने म्हटले की, " भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांत खेळ असो किंवा व्यावसायिक संबंध, आपण फारच पुढे निघून आलो आहोत. अनेक वर्षांपासून आम्ही जगातील या देशाला भेट देण्याचा आनंद लुटत आहोत. आम्ही क्रिकेट खेळण्याचा आणि दोन्ही देशाच्या परंपरांचा आस्वाद घेत आलो आहोत. खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलिया हा सर्वात आव्हानात्मक देशांपैकी एक आहे. खेळाडूंना येथे खेळायला आवडते. कारण ऑस्ट्रेलियातील लोकं खूप उत्साही आहेत. प्रत्येक खेळाडूसाठी स्पर्धा महत्वाची असते. त्यामुळेच ऑस्ट्रेलियात येऊन क्रिकेट खेळणे आमच्यासाठी आव्हानात्मक आहे. " रोहित शर्मा पुढे म्हणाला की, " ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याच्या सुरुवातीलाच आम्हाला यश मिळाले आहे. एक चांगली लय आम्हाला प्राप्त झाली आहे आणि त्यावरच लक्ष केंद्रीत करण्यावर आमचा भर असेल. आम्ही ऑस्ट्रेलियाच्या परंपरांचा आनंद घेतो. प्रत्येक शहरातील वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळे अनुभव देतात. आम्हाला इथे यायला आवडते आणि आम्ही ऑस्ट्रेलियात प्रवासाचा आनंद लुटतो. येत्या काही आठवड्यात आम्ही ऑस्ट्रेलियन आणि भारतीय लोकांचे मनोरंजन करू शकू, असा मला विश्वास आहे. " रोहित शर्मा यावेळी फक्त क्रिकेटबद्दल बोलेल असे वाटले होते. पण रोहित यावेळी दोन्ही देशांबद्दलही बोलला. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध कसे आहेत, यावरही त्याने भाष्य केले. सर्वात महत्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियात आल्यावर भारतीयांना कसे वाटते, हे रोहितने सुंदरपणे सांगितले. त्यामुळे एका कर्णधाराने देशाच्या संसदेत कसे भाषण करावे, याचा हा उत्तम वस्तुपाठ असल्याचे आता म्हटले जात आहे. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या संसदेत केलेले हे भाषण आता चांगलेच गाजले आहे. रोहित शर्माचा हा व्हिडिओ आता चागलाच व्हायरल व्हायला लागला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/CD0YW3b
No comments:
Post a Comment