मुंबई- बॉलिवूड तसेच मराठी इंडस्ट्रीची ड्रामा क्वीन ही अनेकदा तिच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे चर्चेत असते. ती वेगवेगळी अशी काही विधाने करते ज्यामुळे समोरच्याला चक्रावून जायला होतं. आज राखी तिचा ४६ वा वाढदिवस करत आहे. त्यानिमित्त तिने केलेल्या संघर्षाबद्दल जाणून घेऊ. राखी सावंतचे खरे नाव नीरू भेडा आहे. तिने एकदा कबूल केले होते की ती एकेकाळी तिच्या पालकांचे पैसे चोरून घरातून पळून गेली होती. एका रिअलिटी शोमध्ये राखीने या गोष्टीची कबुली दिली होती. राखीने शोमध्ये आपली ओळख नीरू भेडा म्हणून करून दिली, जे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. राखी म्हणाली की ती नीरू आहे. तिला तिच्या भूतकाळाबद्दल आणि काही सत्याबद्दल बोलायला भीती वाटते. तिला हे देखील आठवते की तिच्या आईने तिला सांगितलेले की, ती लहान असताना अनेकदा शेजाऱ्यांनी टाकलेल्या कचऱ्यातून अन्न उचलायची. राखी सावंतचे वडील पोलिसात होते तिचे वडील हवालदार असल्याचेही तिने सांगितले. ती म्हणाली की, 'माझी आई हॉस्पिटलमध्ये आया होती. मी हे कसे सांगू? राजीव, मला माझ्या भूतकाळाबद्दल बोलायला आवडत नाही. नृत्य आणि अभिनयासाठी तिच्या कुटुंबातील कोणीही तिचे कौतुक केले नाही. 'मला घरी परवानगी नव्हती. मी थोडंसंही नाचले आणि आईला कळलं तर ती येऊन हात साफ करायची, मला खूप मारायची. ती म्हणाली, 'माझ्या कुटुंबात मुलीने नाचावे की नाही हा प्रश्नच नाही. पुढे जाण्यासाठी मी आयुष्यात खूप मार खाल्ले आहेत, माझ्या अंगावर अजूनही खुणा आहेत. मी अशाच परिस्थितीत वाढले. मी मोठी झाल्यावर लगेचच माझं लग्न लावून द्यायचं असं माझ्या आई वडीलांनी ठरवलेलं. पण मी त्यांना विरोध केला. मी त्यांना निक्षूण सांगितलं की मी बिलकूल लग्न करणार नाही आणि पळून गेले. माझ्या घरात कोणालाच माहित नव्हतं की अक्टिंग किंवा डान्स कसा करायचा. पण जेव्हा मी सिनेइंडस्ट्रीत आले तेव्हा हळूहळू शिकत गेले. मग मला फक्त इथे काम करायचं होतं. घरातून पैसे चोरून पळून गेले राखी पुढे म्हणाली की, 'मी ऑडिशनसाठी जायचे आणि काम मागायचे. मी तिथे गेल्यावर त्यांना म्हणायचे मी अभिनय करेन, पण मी नेहमी खोटं बोलायचे, कारण मला अभिनय कसा करायचा हेच कळत नव्हतं. मग मी पैसे चोरले आणि घरातून पळून गेले. हे सर्व केले कारण मला हिरोईन व्हायचे होते. ती पुढे म्हणाली की, आयटम गर्ल किंवा कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणजे काय हे तिला माहीत नव्हते, त्यामुळे इंडस्ट्रीत काम करण्याचा दुसरा मार्ग आहे की नाही याचीही कल्पना नव्हती. जेव्हा ती पळून गेली तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्याशी सर्व संबंध तोडले असा तिने खुलासा केला. त्यानंतर राखी बऱ्याच सिनेमांमध्ये झळकली. तिचे अनेक आयटम नंबर सुपरहिट झाले. बिग बॉससाठी ती प्रचंड गाजली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/l2MWH6P
No comments:
Post a Comment