Breaking

Sunday, November 24, 2024

निकालानंतरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट! उद्धव ठाकरेंचे उरलेले आमदारही एकनाथ शिंदेंच्या बरोबर; राज्यात पुन्हा भूकंप होणार? https://ift.tt/wFNPGmR

मुंबई (प्रसाद रानडे): महाराष्ट्रात महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर आता शिवसेनेचे नेते विद्यमान आमदार उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केले असून सेनेचे दोन ते तीन आमदार वगळता अनेक आमदार आपल्या संपर्कात असून आता उद्धव ठाकरे यांनी जास्त बोलू नये आणि त्यांचे उरलेले आमदार देखील आमच्याकडे येतील असाही सूचक इशारा देत उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उदय सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मोठे नेते असून ते संकट मोचक म्हणून ओळखले जातात त्यामुळे उदय सावंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे ज्या वेळेला महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले त्यावेळेला ईव्हीएम मध्ये गडबड नव्हती आणि आता आम्ही निवडून आलो त्यानंतर ईव्हीएम मध्ये गडबड झाली असा आरोप करण्यात येत आहे. मला असं वाटतं की या सगळ्या वर आता हा जनतेचा कौल असून त्यांनी यावर जास्त बोलू नये. त्यांचे उरलेले आमदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर... शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे अनेक आमदार हे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून मी याबाबत काही अधिक बोलणं हे उचित ठरणार नाही, असे सूचक वक्तव्य उदय सामंत यांनी केले आहे.कोकणच्या विकासाला प्राधान्य असून 15 पैकी 14 जागा जिंकून पुन्हा एकदा कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे माननीय बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा कोकण विभाग असल्यास पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. विरोधकांनी केवळ गद्दार म्हणून आरोप केले मात्र हे आरोप केवळ चालत नाहीत काम देखील करावे लागतं आणि विरोधकांची परिस्थिती पाहता गिरे तो भी टांग उपर अशी आहे.या वेळच्या निकालाचा सगळ्यात मोठा गेम असा आहे की आमचे आमदार निवडून आले त्यानंतर आता EVM मध्ये गडबड आहे असा आरोप करतात मात्र तुमचे खासदार त्यावेळेला ईव्हीएम मध्ये गडबड नव्हती आणि आता आम्ही सगळे निवडून आलो त्या वेळेला ईव्हीएम मध्ये गडबड झाली असा आरोप करता.मात्र हा त्यांचा उरलेसुरले आहेत त्याला राजकीय बळ देण्याचा हा सगळा प्रकार आहे असाही टोला उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला आहे. तुमचा आता विरोधी पक्ष नेता देखील मिळू शकत नाही इतकं जनतेने नाकारले आहे. त्यामुळे आता विरोधकांनी आत्मचिंतन करावं नाहीतर उरलेसुरले आमदारही शिंदे साहेबांबरोबर येतील असाही थेट इशारा उदय सामंत यांनी दिला आहे.शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत म्हणून तब्बल पाचव्यांदा आमदार झाले आहेत. तर त्यांचे जेष्ठ बंधू किरण उर्फ भैय्या सामंत हेही राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. तसेच विद्यमान आमदार उदय सामंत हे राज्याच्या मावळत्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री आहेत. मात्र आता नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात उदय सामंत यांचे मंत्रीपद नक्की कोणत्या खात्याचा असेल याबाबतही अनेकांना उत्सुकता लागली आहे एकच नाही तर रत्नागिरी जिल्ह्यातून दुसऱ्यांदा आमदार झालेले शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र व विद्यमान आमदार योगेश कदम या युवा नेतृत्वाला मंत्रिमंडळ स्थान मिळेल का किंवा मिळालं तर कोणतं खाते मिळेल? या सगळ्याकडे अवघ्या कोकणच्या नजरा लागले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ixO8Wpn

No comments:

Post a Comment