Breaking

Thursday, November 28, 2024

पत्नी बाहेरुन आली, पतीला समोर पाहताच हंबरडा फोडला; चिठ्ठी लिहून शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल https://ift.tt/gpaZdy9

निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी जिल्ह्यात एका खाजगी शिक्षकाने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकाने आत्महत्येचं कारणही सांगितलं असून सुसाईड नोटही लिहिली आहे.

नेमकं काय घडलं?

जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंपजवळ राहणाऱ्या एका खासगी शिक्षकाने राहत्या घरात सुसाईड नोट लिहून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना गुरुवार २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहुल आंबादास पाटील, वय ३५ रा. बोरखेडा ता. धरणगाव ह. मु. गुजराल पेट्रोलपंप, जळगाव असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

आजाराला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील रहिवासी राहुल आंबादास पाटील हे आपल्या पत्नी आणि आई यांच्यासोबत जळगावातील गुजराल पेट्रोल पंपाजवळ वास्तव्याला होते. ते शहरातील खासगी क्लासेसमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पोटाचा गंभीर आजार असल्याचं समजलं होतं. त्यांच्यावर उपचारदेखील सुरू होते.

सुसाईड नोट लिहून संपवली जीवनयात्रा

पोटाच्या आजारामुळे त्यांच्यावर पोटाची दोन वेळा शास्त्रक्रिया देखील झाली होती. दरम्यान, पोटाच्या आजारालाच्या सततच्या त्रासाला कंटाळून आपण गळफास घेत असून यात कुणालाही दोषी ठरवू नये, अशी सुसाईड नोट लिहून त्यांनी गुरूवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घरात कुणीही नसताना आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

पत्नी घरात नसताना गळफास घेतला

राहुल पाटील यांची पत्नी बाहेर गेली असताना राहुल यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. पत्नी घरात आल्यानंतर तिने पतीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं पतीला पाहताच तिने हंबरडा फोडला. तात्काळ राहुल यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Gu4UTMk

No comments:

Post a Comment