कोल्हापूर (नयन यादवाड): चार दिवसांपूर्वी निवडणुकीचा फायदा घेत होऊन तावडे हॉटेल येथे एका व्यावसायिकाची २५ लाख ५० हजारांची रक्कम चार ते पाच जणांच्या टोळीने लंपास केल्याचे घटना घडली होती यानंतर पोलीस प्रशासन आणि अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. मात्र अवघ्या चार दिवसात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावत, या गुन्ह्यातील संजय महादेव किरणगे (४२, रा. विक्रमनगर, ता. करवीर), अभिषेक शशिकांत लगारे (२४) आणि विजय तुकाराम खांडेकर (२८, दोघे रा. उचगाव, ता. करवीर) यांना पोलिसांनी अटक केली. स्वप्नील उर्फ लाला तानाजी जाधव (रा. पाचगाव) आणि हर्षद खरात (रा. राजारामपुरी) या दोघांचा अद्याप शोध सुरू असून लुटीतील २५ लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार असा सुमारे ५५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आले आहे.तपासणी अधिकारी असल्याचे भासवत लूट १२ नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास तावडे हॉटेलच्या हायवे ब्रिजच्या बाजूला सर्विस रोडवर व्यावसायिक सुभाष लक्ष्मण हारणे, रा. बागल चौक, कोल्हापूर यांना ५ लोकांच्या टोळीने निवडणूक तपासणी अधिकारी असल्याचे भासवत गाडी तपासणी करून २५ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल हॅन्डसेट लंपास केल्याची घटनासमोर आली होती. विधानसभा निवडणूका आणि त्याची आचार संहिता सुरू असल्याने तोतया तपासणी अधिकारी भासवत गुन्हा केल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी तात्काळ तपासणी करण्याच्या सुचना दिल्या होत्या. असा केला तपास त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील ६ तपास पथके नेमून या गुन्ह्याचा तपास सुरू होता. संशयित कारचे सीसीटीव्ही फुटेज मिळताच त्यावरून कारच्या मालकाचा शोध पोलिसांनी सुरू केला होता. तर कारच्या मालकाकडे चौकशी केल्यानंतर टोळीतील संशयितांची नावे समोर आली. अशातच गोपनीय बातमीदारामार्फत रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय किरणगी व त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केला असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. तसेच ते गुन्हा केल्यानंतर चित्रनगरीमार्गे पाचगावला पोहोचून लुटीसाठी वापरलेली निसान कार ठेवून, दुसरी हॅरिअर कार घेऊन ते निपाणीच्या दिशेने गेले. कोगनोळी टोल नाक्यावर तपासणी नाक्यात अडकू नये आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसू नये यासाठी ते कोगनोळी गावातून पुढे कर्नाटकमध्ये जाऊन पुढे गोवा येथे पळून गेले असल्याची माहिती मिळताच. एक पथक तात्काळ गोवा येथे रवाना झाले. मात्र तपासादरम्यान संशयित आरोपी गोवा येथुन कोल्हापूरच्या दिशेने परत येत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राधानगरी ते कोल्हापूर रोडवर पुईखडी या ठिकाणी सापळा रचून संशयित आरोपी संजय महावीर किरणगे, वय ४२, अभिषेक शशिकांत लगारे, वय २४, विजय तुकाराम खांडेकर, वय २८ सर्वजण रा. कोल्हापूर यांना आणि गुन्हा करतेवेळी वापरलेल्या टाटा हॅरियर व निसान गाडीसह ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. अद्याप दोन संशयतांचा तपास सुरूदरम्यान या गुन्ह्यात आणखी २ संशयित आरोपी स्वप्निल उर्फ लाला तानाजी जाधव व हर्षद खरात ते सध्या कोठे आहेत याबाबत माहिती नसल्याचे सांगीतले.मात्र हे दोघे देखील कर्नाटक येथुन परत कोल्हापूर येथे रक्कम घेवून येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा कट रचल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या ३ आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली २५ लाख रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी असा एकूण ५५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच २ आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली असून गुन्ह्याचा पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव करीत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/ux2ADsG
No comments:
Post a Comment