मुंबई- साऊथकडील सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा सध्या खूप चर्चेत आहे. तिने नुकतेच अभिनेता धनुषवर तीन पानी पोस्ट शेअर करुन आरोप केले. धनुष तिच्या डॉक्यूमेंटरीमध्ये तिची छोटी व्हिडिओ क्लिप वापरु देत नसल्याचा तिचा आरोप आहे. अशातच अभिनेत्री आज तिचा ४० वा वाढदिवस साजरा करतेय. नयनातारा आता विग्नेश शिवनसोबत विवाहबद्ध असली तरी एके काळी तिची आणि कोरिओग्राफर प्रभूदेवासोबतच्या अफेअरमुळे बरीच चर्चेत होती. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांना वेड लावणाऱ्या साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एका अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. नयनतारा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. १८ नोव्हेंबर १९८४ रोजी बेंगळुरू येथे जन्मलेल्या नयनताराने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या शानदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्रीने २००३ मध्ये एका मल्याळम चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक यशस्वी चित्रपट केले, ज्यामुळे नयनताराची गणना सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. मल्याळी सीरियन ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या नयनताराचे वैयक्तिक आयुष्य अनेकदा चर्चेत राहिले आहे. नयनताराचे खरे नाव डायना मरियम कुरियन आहे. तिच्या वडिलांचे नाव कुरियन कोडियट्टू आणि आईचे नाव ओमान कुरियन आहे. कला शाखेत पदवी घेतल्यानंतर नयनताराने चित्रपट जगताकडे करिअर करण्याचा निर्णय घेतला. बिगिल, दरबार, विल्लू, माया सारखे हिट चित्रपट देणाऱ्या नयनताराचे (नयनतारा लव्ह स्टोरी) लव्ह लाइफ देखील मनोरंजक आहे. तिचे कोरिओग्राफर प्रभुदेवासोबत अफेअर होते. त्यावेळी प्रभुदेवाचे लग्न झाले होते. त्याला तीन मुले होती. तरीही नयनतारा आणि प्रभुदेवा एकमेकांच्या प्रेमात पडले. ते एकमेकांसाठी इतके वेडे झाले होते की ते एकत्र राहू लागले. नयनतारानेही त्याच्यावरच्या प्रेमासाठी धर्म बदलला. नयनतारा ही मूळची ख्रिश्चन होती, तिचा जन्म एका कट्टर ख्रिश्चन कुटुंबात झाला होता पण प्रभू देवासोबत लग्न करण्यासाठी तिने २०११ मध्ये हिंदू धर्म स्वीकारला. काहीही झाले तर प्रभदेवाशी लग्न करायचं असं तिने ठरवलेलं पण जेव्हा या अफेअरची माहिती प्रभूदेवाच्या पत्नीला समजली तेव्हा तिने नयनताराविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. तसेच तिने धमकीसुद्धा दिली जर प्रभूदेवाने नयनताराशी लग्न केले तर ती उपोषणाला बसेल. काहीही झालं तरी लताला तिच्या नवऱ्याला सोडायचं नव्हतं. लताच्या हट्टामुळे नयनताराने स्वतः तिला फोन करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर प्रभुदेवाशी लग्न करण्यासाठी तिने लताला ३ कोटी रुपये, सोन्याची काही नाणी आणि ८५ लाख रुपये किमतीचा हार ऑफर केला होचा. त्याच वेळी, प्रभुदेवाने मीडियामध्ये वक्तव्ये द्यायला सुरुवात केली की नयनतारा त्याच्यासाठी खूप खास आहे आणि तो तिच्याशी लग्न करणार आहे. मात्र, त्यानंतर अचानक त्यांचे नाते संपुष्टात आले. आज ही अभिनेत्री विघ्नेश शिवनसोबत खूप आनंदी आहे आणि दोघेही आपल्या मुलांसोबत आनंदी जीवन जगत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/O1eAIr9
No comments:
Post a Comment