Breaking

Saturday, November 30, 2024

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! राजधानीत आम आदमी पक्षाच्या आमदाराला अटक, पाहा काय घडले अचानक https://ift.tt/nFQVovb

नवी दिल्ली: उत्तम नगरचे यांना दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्राँचने शनिवारी अटक केली. ऊर्फ नंदू याच्याशी असलेल्या संबंधावरून झालेल्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. बालियान यांच्या अटकेला दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयाकडून दुजोरा देण्यात आला आहे. त्याआधी भाजपकडून आपचे आमदार नरेश बालियान यांची एक ऑडियो क्लिप प्रसिद्ध करण्यात आली होती. ज्यात गँगस्टर आणि बालियान यांची फोनवरील बोलने होते. भाजपने आप पक्षाला गँगस्टर आणि वसूली पार्टी असल्याचे म्हटले आहे. गँगस्टर कपिल सांगवान ऊर्फ नंदू याच्यासोबत काही गोष्टींवरून वाद झाल्यानंतर आपचे आमदार बालियान यांना धमकी देण्यात आली होती. ज्याचा खुलासा नवभारत टाईम्सने जुलै २०२३ मध्ये केला होता. तेव्हा असे सांगण्यात आले होते की, आमदारांना सातत्याने फोन येत आहेत. त्याने धमकी दिली आहे की तो खंडणीसाठी आपले टार्गेट बोलवेल, ज्यांच्याकडून आमदार पैसे गोळा करेल आणि आपल्या गुंडांना देईल.त्याच पद्धतीने बिल्डरांच्या व्यवसायात नंदूचा वाटा फिक्स केला जाईल. मात्र आमदाराने असे करण्यास नकार दिला. त्यानंतर नंदूने सातत्याने फोन करत आमदारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. जर आमदाराने असे केले नाही तर त्याच्या नावाने जबरदस्ती वसूली केली जाईल. नंदू गँगस्टरने आमदार बालियान आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदू त्याचा भाऊ ज्योती सांगवान उर्फ बाब याच्या नेटवर्कचा वापर करून ही धमकी देत होता. या प्रकरणी चौकशी दरम्यान आमदार सहकार्य करत नसल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. कपिल सांगवान हा दिल्लीचा कुख्यात गुंड असून तो सध्या लंडनमध्ये राहतो. त्याने दिल्ली आणि परिसरातील लोकांकडून विशेषतः व्यावसायिकांकडून खंडणी घ्यायचा, पैसे न दिल्यास तो खूनही करायचा. २०२३ मध्ये त्याने दिल्लीतील उत्तम नगरमध्ये भाजप नेते सुरेंद्र मतियाला यांची हत्या केली होती. त्याच वर्षी हरियाणामध्ये एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नफे सिंग यांची हत्या केली होती. कपिल उर्फ नंदू हा नजफगडचा रहिवासी असून त्याच्यावर २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गेल्या पाच वर्षांपासून तो इंग्लंडमध्ये आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/eq1z5Sj

No comments:

Post a Comment