Breaking

Saturday, November 30, 2024

रमाकांत आचरेकर सरांचे स्मारक भावी पिढ्यांना प्रेरणा देईल, प्रवीण अमरे यांचे उद्गार https://ift.tt/GUPnead

विनायक राणे : ‘महान क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे येथील स्मारक भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील’, असे उद्गार भारताचे माजी क्रिकेटपटू यांनी शनिवारी काढले. आचरेकर यांच्या स्मारकाचे अनावरण भारतरत्न कसोटीपटू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख यांच्या हस्ते ३ डिसेंबरला होणार आहे. या अनावरणाआधी अमरे यांनी शिवाजी पार्कात आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधला.राज्य सरकारने गेल्या ऑगस्टमध्येच शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक ५ येथे आचरेकर यांच्या स्मारकासाठी हिरवा कंदील दाखविला होता. ‘आम्हा सगळ्यांसाठी हा सर्वांत मोठा क्षण ठरणार आहे... कारण आम्हा सगळ्यांनाच आचरेकर सरांचे भरीव योगदान ठाऊक आहे. त्यांनी दिलेल्या क्रिकेटधड्यामुळे आमची क्रिकेटकारकीर्द बहरलीच; पण आता आम्ही मार्गदर्शक म्हणून जे काही काम करत आहोत, त्यातही गुरू आचरेकर सरांचा मोलाचा वाटा आहे’, असे प्रवीण अमरे म्हणाले. ‘आम्हा सगळ्यांचीच ही इच्छा होती... कारण सर कायम शिवाजी पार्कातच असायचे. ही माझी कर्मभूमी आहे, असे ते अभिमानाने म्हणत. या कर्मभूमीत सरांचे स्मारक झाले ही आमच्यासाठी खरोखरच खूप मोठी बाब आहे. मी पुन्हा एकदा नमूद करतो, की हे स्मारक पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील’, असे अमरे यांनी सांगितले. आचरेकर यांना १९९०मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने, तर २०१०मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. जानेवारी २०१९मध्ये त्यांचे निधन झाले. ‘शालेय क्रिकेटपटू म्हणून आम्ही आचरेकर सरांकडे खेळाचे धडे गिरवायला यायचो. मग कॉलेज क्रिकेटपटू झालो, पुढे कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा त्यानंतर रणजी अन् मग भारताचे प्रतिनिधित्व केले... त्या संपूर्ण प्रवासात आचरेकर सर आमच्यापाठीशी खंबीर उभे राहिले. सचिन तेंडुलकरचा भारतरत्नपर्यंतचा प्रवास सरांनी पाहिला आहे...’, असे प्रवीण अमरे म्हणाले. रमाकांत पारकर, बलविंदर सिंग संधू, लालचंद राजपूत, चंद्रकांत पंडित, प्रवीण अमरे, समीर दिघे, , संजय बांगर, पारस म्हाब्रे, रमेश पोवार, अजित आगरकर आणि अर्थात सचिन तेंडुलकर या आचरेकर यांच्या शिष्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ‘मेहनतीला पर्याय नसतो, तुमची कामगिरी बोलकी असायला हवी... हे आचरेकर यांनी आमच्या मनावर बिंबवले. खेळावर श्रद्धा असावी, क्रिकेटचा आदर ठेवा, असे त्यांचे कायम सांगणे असे. हा सरांकडून लाभलेला सर्वात मोठा ठेवा आहे’, असे अमरे यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/wkSOgvb

No comments:

Post a Comment