Breaking

Monday, November 4, 2024

कोल्हापुरात दुसरा भूकंप! ऐन निवडणुकीच्या काळात सत्यजित कदमांचा भाजपला रामराम https://ift.tt/SPv9WVn

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी माघार घेण्याच्या दिवशी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी घेतलेल्या माघारीवरून सोमवारी मोठा राजकीय भूकंप झाला. या माघारीवर चर्चा संपण्याच्या आधीच कोल्हपूरात दुसरा राजकीय भूकंप झाला आहे.कोल्हापुरात सोमवारी आणि काँग्रेसमध्ये दिवस पर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आता महायुतीमध्ये देखील मोठा भूकंप झाला आहे. भाजपचे नेते आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढलेले यांनी ऐन निवडणुकीच्या काळात भाजपला रामराम केला आहे. कदम उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. भाजपमधून सत्यजित कदम होते इच्छुक मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारी दिवसभरात काय घडले?सोमवार ४ नोव्हेंबर ही विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख होती. राज्यात अनेक मतदारसंघातून बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे महाविकास आघाडी आणि यातील सहा पक्ष बंडखोरांना माघार घेण्याच्या मागे लागले होते. अशात कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी दुपारी निवडणुकीतून माघार घेतली. अचानक झालेल्या या घडामोडीमुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. मधुरिमाराजे यांनी नाइलाजामुळे माघार घेतल्याचे खासदार शाहू महाराज यांनी सांगितले. मात्र यावर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ज्या मतदारसंघात आधी उमेदवार जाहीर करून नंतर दुसरा उमेदवार दिला होता तेथे अशी वेळ यावी यामुळे या घटनेची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू झाली. यावर भाजपचे खासदार महाडिक यांनी सतेज पाटलांवर जोरदार टीका केली. दरम्यान शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार अशा बातम्या सोशल मीडियावर फिरू लागल्या. तर दुसरीकडे सतेज पाटील यांनी संध्याकाळी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. मधुरिमाराजे छत्रपती यांनी असा निर्णय का घेतला याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही असे त्यांनी सांगितले. घडलेला प्रसंग सांगताना त्यांना अश्रूअनावर झाले होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/YzAbtEv

No comments:

Post a Comment