Breaking

Wednesday, November 20, 2024

वाढला टक्का, कुणाला धक्का; नागपुरातील बारा जागांवर इतके टक्के मतदान; कोणाचे जड पारडे करणार? https://ift.tt/wD9q7XR

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरराज्यातील दिग्गज नेत्यांच्या जिल्ह्यातील बारा जागांवर सुमारे ५८ ते ६० टक्के झालेले मतदान महायुती की महाआघाडीचे पारडे जड करते याची उत्सुकता आता मतदारांना लागली आहे. बोगस मतदान, पैसे वाटप, इव्हीएम नेणारे वाहन अडवणे, केंद्रावरील सीसीटीव्ही बंद करण्याच्या घटनांमुळे हिंगणा, मध्य व पूर्व नागपुरात सायंकाळी वातावरण तापले होते. लोकसभा निवडणुकीतील चुका टाळण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला तर, पोलिसांनी चोख भूमिका बजावली. कुठे थेट तर, कुठे कांटे की टक्कर वा तिरंगी लढतीमुळे कोण विजयी होणार याचे अंदाज बांधणे सुरू झाले. , माजी मंत्री डॉ. , , काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह अन्य उमेदवारांचा फैसला शनिवारी होईल.शहरातील सहा व ग्रामीणमधील तितक्याच मतदारसंघात मावळते बुधवारी मतदान झाले. सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. यावेळीही बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी आल्या. आधीच मतदान झाल्याचे लक्षात आल्याने मतदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यामुळे काही मतदान केंद्रांवर गोंधळ झाला. बडे नेते, उमेदवार, व शहरातील अनेक मान्यवरांनी कुटुंबीयांसह सकाळच्या पहिल्या दोन टप्प्यातच मतदान केले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे यंत्रणांवरील भार कमी झाला.जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५६.०६ टक्के मतदान झाले होते. यात नंतरच्या एक तासात ३ ते ४ टक्के भर पडेल, असा अंदाज निवडणूक प्रक्रियेतील तज्ज्ञांनी व्यक्त केला. शहरातील दक्षिण-पश्चिम, दक्षिण, पूर्व, मध्य, पश्चिम व उत्तर या सहाही मतदारसंघात गेल्यावेळच्या तुलनेत टक्का वाढला. उत्तर नागपुरात सायंकाळी गर्दी झाल्याने उशिरापर्यंत मतदान चालले. रात्री उशिरापर्यंत बुथनिहाय आकडेवारी न आल्याने पोल मॅनेजर्सना निकाल व मताधिक्याचा अंदाज बांधताना बरीच दमछाक करावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील दोन दिवसांपूर्वीचा हल्ला बराच गाजला. हल्यानंतर लगेच काय परिणाम होतील, याचा अंदाज आघाडी, युतीकडून घेण्यात आला.दक्षिण-पश्चिममध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस व काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांच्यात थेट लढत झाली. गुडधे यांनी मतदान केल्यानंतर मतदारसंघातील विविध भागांना भेट दिली. या तुलनेत भाजपचे नेते रिलॅक्स होते. उत्तरमध्ये काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत, भाजपचे डॉ. मिलिंद माने व बसपचे मनोज सांगोळे अशा तिरंगी लढतीत एकाच समाजाच्या उमेदवारांमुळे मतविभाजनाची धास्ती काँग्रेसने घेतली होती. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीचा फिल विभाजनाचा नव्हता. या वातावरणात नितीन राऊत यांनी विविध बुथवर भेटी देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. दक्षिणमध्ये भाजपचे मोहन मते व काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्यात कांटे की टक्कर दिसून आली. पूर्वत भाजपचे कृष्णा खोपडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) दुनेश्वर पेठे, अपक्ष पुरुषोत्तम हजारे व आभा पांडे असा चौरंगी सामना करावा लागला. मध्यमध्ये भाजपचे प्रवीण दटके, काँग्रेसचे बंटी शेळके व अपक्ष रमेश पुणेकर अशी तिरंगी लढत झाली. पश्चिममध्ये काँग्रेसचे विकास ठाकरे व भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात अपक्ष नरेंद्र जिचकार यांनी चुरस निर्माण केल्याची भावना मतदारांनी व्यक्त केली.ग्रामीणमध्ये कामठीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर काँग्रेस सुरेश भोयर यांनी दमदार आव्हान उभे केले. शिवसेनेच्या रामटेकच्या गडाला अपक्ष राजेंद्र मुळक यांनी आव्हान दिले. शिवसेनेचे (शिंदे गट) आशिष जयस्वाल व शिवसेनेचे (ठाकरे गट) विशाल बरबटे अशी तिरंगी लढत झाली. सावनेरमध्ये सुनील केदार यांना शह देण्यासाठी आशिष देशमुख यांनी चांगली लढत दिल्याचे दिसून आले. केदार यांच्या पत्नी अनुजा व देशमुख यांच्यात कोण बाजी मारेल याबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अपक्ष डॉ. अमोल देशमुख किती मते घेतात, याचाही अंदाज लावल्या जात आहे. काटोलमध्ये सलील देशमुख यांनी भाजपचे चरणसिंग ठाकूर यांना आव्हान दिले. अपक्ष याज्ञवल्क्य जिचकार यांच्या मतांचाही अंदाज घेतला जात आहे. उमरेडमध्ये काँग्रेसचे संजय मेश्राम यांनी भाजपचे सुधीर पारवे यांना चांगली लढत दिली. हिंगण्यात भाजपचे समीर मेघे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) रमेश बंग यांनी चांगले आव्हान उभे केल्याचे मतदानादरम्यान दिसून आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/mgfpWSE

No comments:

Post a Comment