Breaking

Tuesday, November 19, 2024

कोकणात काय घडणार? महायुतीला रोखण्यासाठी आघाडीची खेळी; मात्र कोणासाठी ठरणार सेफ गेम? https://ift.tt/WYashyO

प्रसाद रानडे, रत्नागिरी : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघात नेमकं काय होतं याची उत्सुकता आहे. बहुतांशी लढती या शिवसेना विरुद्ध शिवसेना अशाच आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची तर ठाकरे गटासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. मात्र असं असलं तरीही या निवडणुकीत जिल्ह्यातील आणि कणकवली विधानसभा मतदारसंघ हे मतदारसंघ महायुतीसाठी सेफ गेम ठरण्याची शक्यता महाराष्ट्र टाइम्सच्या अंदाज आपला आपला या कार्यक्रमात बोलताना कोकणातील ज्येष्ठ पत्रकार प्रा. कैलास गांधी यांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार सुदेश मालवणकर, प्रा.कैलास गांधी , प्रशांत कांबळे, मंगेश शिंदे महिला पत्रकार ज्योती बिवलकर सहभागी झाले होते.प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. एकंदर ही निवडणूक कोणत्या मुद्द्यांवरती गाजली, कोणत्या राजकीय नेत्यांच्या सभा झाल्या, कोकणातील विकासाचे कोणते मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरले. या सर्वांचा कितपत प्रभाव पडेल आदी सविस्तर चर्चा या कार्यक्रमात करण्यात आली होती. या सगळ्यांनी कोकणात लोकसभा निवडणुकीपेक्षा या वेळेला वातावरण वेगळे असल्याचे मत व्यक्त करताना विधानसभा निवडणुका या स्थानिक पातळीवरती काही महत्त्वाचे मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून होत असतात. कोकणात सामाजिक आणि आरक्षण या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जात नाहीत, असं कोकणचं वैशिष्ट असल्यासही त्यांनी यावेळी नमूद केलं.रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा मंत्री यांनी तब्बल गेली वीस वर्ष आपल्या वर्चस्वाखाली राखलेला मतदार संघ आहे. गेली चार टर्म या मतदारसंघात ते आमदार आहेत. मात्र यावेळी शिवसेना भाजपा युती असतानाही भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी उदय सामंत यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली. इतकंच नाही, तर त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आणि उमेदवारीही मिळवली. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा सामंत विरुद्ध माने असा सामना रंगणार आहे. मात्र माने यांनी आव्हान दिल्यानंतरही आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उदय बने यांच्यासारखे ज्येष्ठ शिवसैनिक त्यांची नाराजी ही सामंत यांच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळे माने यांनी जरी सामंत यांच्या विरोधात शड्डू डोकला असला, तरीही सामंत यांचा आजवरच्या विजयाचा वारू रोखण्यात कितपत यश हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उदय सामंत हे या ही निवडणुकीत निश्चित असल्याने त्यांनी राज्यभर प्रचार दौरे केले. यापूर्वी अनेक विकास कामे आणि पक्षप्रवेशांचा धुमधडाका लावला होता, त्यामुळे महायुतीसाठी हा मतदारसंघ सेफ गेम ठरण्याची शक्यता असल्याचं ज्येष्ठ पत्रकार कैलास गांधी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या ठिकाणी सामंत यांना रोखण्यात कितपत यश ठाकरे गटाला येतं हे मात्र पाहावं लागेल.तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली देवगड हा मतदारसंघ भाजपाचा पारंपारिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच मतदारसंघातून भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार हे गेली दोन टर्म आमदार राहिले आहेत. या वेळेला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा ते रिंगणात आहेत. त्यांच्यासोबत ठाकरे गटाकडून कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदारसंघ पूर्वी भाजपाचे माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांचा होता. त्यामुळे भाजपची मोठी ताकद या मतदारसंघात आहे. मात्र शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राणे यांच्यासमोर आव्हान उभं करण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला आहे. पण या मतदारसंघातली आजवरची राजकीय गणित पाहता महायुतीसाठी कणकवली मतदारसंघही सेफ गेम ठरू शकतो, त्यामुळे नितेश राणे यांना रोखण्यात कितपत यश येतं हे पाहावे लागेल.दरम्यान अजितदादांचे राष्ट्रवादीचे आमदार असलेले चिपळूण मतदारसंघाचे शेखर निकम यांच्यासाठी ही निवडणूक तितकी सोपी राहिली नाही. संगमेश्वर देवरुखपर्यंत या मतदारसंघाचा विस्तार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून या ठिकाणी शरद पवारांचे शिलेदार प्रशांत यादव हे काम करत होते, त्यामुळे या सगळ्याचा सामना शेखर निकम यांना करावा लागणार आहे, त्यामुळे या मतदारसंघात कदाचित चमत्कार होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पत्रकार कैलास गांधी यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली आहे.या विधानसभा निवडणुकीत कोकणात सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ मालवण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर हे दोन मतदारसंघ मोठे चर्चेत राहिले आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते विद्यमान आमदार यांना शह देण्यासाठी महायुतीकडून पहिल्यांदाच कुणबी समाजाला प्रतिनिधित्व गुहागरचे माजी नगराध्यक्ष यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. आमदार भास्कर जाधव यांच्यासारख्या दिग्गज नेत्यासमोर महायुतीच्या या उमेदवाराचा कितपत टिकाव लागतो हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू हे महायुतीकडून रिंगणात आहेत. त्यांच्यासोबत तीन वेळा निवडणूक लढवलेले राजन साळवी हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, मात्र या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी केलेली बंडखोरी ही भैय्या सामंत यांच्या पथ्यावर पडू शकते. मागच्या निवडणुकीत आमदार राजन साळवी यांचा सुमारे तेरा हजार मतांनी विजय झाला होता. मात्र ही सगळी गणितं किरण सामंत यांच्या एंट्रीने बदलली आहेत, असेही मत यावेळी राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/avRy3pA

No comments:

Post a Comment