Breaking

Wednesday, November 13, 2024

IND vs SA तिसरा टी २० सामना एका षटकानंतर थांबवावा लागला, नेमकं काय घडलं पाहा व्हिडिओ... https://ift.tt/Ic8n5Xg

सेंच्युरियन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा अचानक थांबवण्याची वेळ आली. भरातीय संघाने एक षटक पूर्ण केले आणि त्यानंतर हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मैदानात नेमकं घडलं तरी काय, याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज फलंदाजी केली. तिलक वर्माने यावेळी ८ चौकार आणि सात चौकारांच्या जोरावर १०७ धावांची खेळी साकारली. अभिषेक शर्माला त्याला अर्धशतकी साथ दिली. त्यामुळे भारताला २१९ धावा करता आल्या. त्यानंतर भारतीय संघाचे २२० धावांचे आव्हान गाठण्यासाठी जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरला तेव्हा एका षटकातच सामना थांबवावा लागला. यावेळी मैदानात नेमकं काय घडलं, याचा झाला आहे.अर्शदीप सिंगने भारताचे पहिले षटक टाकले. या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सात धावा केल्या, ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश होता. पण जेव्हा हे अर्शदीप सिंगचे षटक संपले, तेव्हा मैदानातील पंचांनी हा सामान थांबवण्याचा निर्णय घेतला. कारण भारताचे एक षटक जेव्हा पूर्ण झाले तेव्हा मैदानात उडणाऱ्या पाखरांचा जास्त प्रभाव पाहायला मिळाला. ही पाखरं एवढ्या मोठ्या संख्येने उडत होती की, तेव्हा खेळणे अशक्य होते. खेळाडूंना यावेळी एकमेकांशी बोलताही येत नव्हते. त्यामुळे यावेळी मैदानात खेळणे कोणत्याही खेळाडूंना जमणार नव्हते. मैदानातील पंचांनी यावेळी ही गोष्ट पाहिली आणि त्यांनी काही काळासाठी हा सामना स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मैदान सोडले आणि ते पेव्हेलियनच्या दिशेने निघाले. त्यामुळे हा सामना काही वेळासाठी थांबवण्यात आला. त्यानंतर काही वेळाने मैदानात या पाखरांना पळवण्यासाठी काही योजना आखण्यात आली. खेळपट्टीवर काही पाखरं दिसली, तेव्हा खेळपट्टी स्वच्छ करण्यात आली. त्यानंतर दोन्ही पंचांनी मैदानाची पाहणी केली. त्यानंतर दोन्ही कर्णधारांना त्यांनी सामना कधी सुरु होणार हे कळवले.क्रिकेटच्या मैदानात क्वचित होणारी गोष्ट यावेळी पाहायला मिळाली. पावसामुळे सामना काही वेळ थांबल्याचे सर्वांनी पाहिले आहे. पण पाखरांमुळे सामना थांबवण्याची ही फारच कमी वेळ असावी.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/s9SbcuZ

No comments:

Post a Comment