मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील केंद्र बिंदू पुन्हा पुन्हा पवार कुटुंबावर आणि या लढतीकडे जात आहे. मतदारसंघात अजित पवारांविरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होत आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी यांच्या पत्नी देखील दिसत आहे. यावर अजित पवारांनी एका मुलाखतीत माझा पराभव करण्यासाठी प्रतिभाकाकी देखील प्रचार करत आहेत आणि याचे आपल्याला वाईट वाटते.आपण कधी तरी त्यांना याबद्दल विचारू असे अजितदादा म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर आता शरद पवारांनी उत्तर दिले आहे. बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या विरोधात पवार कुटुंबातील सदस्य प्रचार करत आहेत. मात्र यात प्रतिभा काकींना पाहिले. मला पाडण्यासाठी त्या प्रचार करत आहेत याचे वाईट वाटले. इतक्या वर्षात त्या कधीच माझ्या प्रचाराला आल्या नाहीत. मी त्यांच्या फार जवळचा आहे, असे सांगत अजित दादांनी आपण याबद्दल त्यांना कधी तरी विचारू असे म्हटले होते. यावर शरद पवारांनी स्पष्टपणे उत्तर दिले आहे. ही साधी गोष्ट आहे. तुम्ही तुमचा विचार सोडला. इतक्या वर्षात तुमच्या ज्या विचारांशी नाते होते ते सोडले, त्याचे उत्तर त्यांना (अजित पवार) त्यांना द्यावे लागले असे सांगत शरद पवारांनी स्पष्ट केले की- हे का करताय हे विचारायचे काही कारणच नाही. तुमची जी मुळ विचारसरणी आहे त्याच्याशी प्रामाणिक राहिले पाहिजे.ते न करता जर तुम्ही दुसऱ्या गोष्टीशी जवळीक करत असाल तर तो संधीसाधूपणा आहे. 'बटेंगे तो कटेंगे'वर काय म्हणाले?बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी भाजपच्या बटेंगे तो कटेंगे यावर देखील मत व्यक्त केले. भाजपकडून राज्यात जो प्रचार केला जात आहे. मग ते पंतप्रधान मोदी असोत की देवेंद्र फडणवीस असोत त्यातून सरळसरळ धार्मिक उच्छाद मांडला जात आहे. बटेंगे तो कटेंगे म्हणजे काय? असा सवाल करत पवारांनी हे तुम्ही समाजातील एका वर्गाबद्दल सांगत आहात. हे देशाच्या ऐक्याच्या दुष्टीने घातक असल्याचे पवार म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/T6WdYiO
No comments:
Post a Comment