मुंबई: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. यांच्या नेतृत्त्वात महायुती सराकरमध्ये मंत्र्यांचा शपथविधीही झाला. पण, खातेवाटप झाले नव्हते. त्यामुळे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बिनखात्याचे मंत्री होते. मात्र, आज हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अखेर मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट असेलल्या भाजपच्या १९, शिंदेंच्या ११ आणि अजितदादांच्या ९ मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे. यामध्ये महायुतीत ज्यावरुन नाराजी नाट्य रंगलं होतं ते गृहखातं फडणवीसांनी आपल्याकडेच ठेवलं आहे. महायुती सरकारच्या सत्तास्थापनेला उशीर झाला तो या गृहखात्यामुळेच. कारण, यांनी भाजपकडे गृहखात्याची मागणी केली होती. पण, यासाठी भाजप तयार नव्हतं आणि गृहखात्यासाठी शिंदेही अडून बसले होते. ज्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी आपल्या पदाची शपथ घेतली, त्याच्या काही तासांपूर्वीपर्यंत शिंदे शपथ घेणार की नाही हे ठरलेलं नव्हतं, ते या गृहखात्यामुळेच. पण, अखेर ते गृहखातं फडणवीसांनी आपल्याकडेच ठेवलं आहे. आता गृहखातं तर गेलं, पण त्या मोबदल्यात एकनाथ शिंदेंनी अनेक महत्त्वाची खाती आपल्या सेनेच्या मंत्र्यांच्या पारड्यात खेचून आणली आहे. तर, त्यांच्या स्वत:कडेही दोन अत्यंत शक्तीशाली खाती आहेत. फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ यांचं जरी मुखमंत्रीपदावरुन डिमोशन झालं असलं तरी खात्यांमध्ये त्यांचं प्रमोशन झालं आहे. त्यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण ही दोन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, शिवसेनेच्या नेत्यांकडेही महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत.
शिंदेंच्या नेत्यांकडे कुठली खाती?
उदय सांमत - उद्योग व मराठी भाषाप्रताप सरनाईक - वाहतूकशंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालयभरत गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन, मीठ पान जमीन विकासप्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणदादा भूसे - शालेय शिक्षणगुलाबराव पाटील - पाणीपुरवठासंजय राठोड - मृदा व जलसंधारणसंजय शिरसाट - सामाजिक न्यायराज्यमंत्रीयोगश कदम - ग्रामविकास, पंचायत राजआशिष जैस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्यायfrom Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hQ2NAe8
No comments:
Post a Comment