Breaking

Thursday, December 26, 2024

उशीरा का होईना सुप्रिया सुळे यांना शहाणपण सुचलं, EVM वरुन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा टोला https://ift.tt/wVu5dr9

अर्जुन राठोड, : ईव्हीएमबाबत यांना उशिरा शहाणपण सुचलं आहे, काही हरकत नाही, देर आये दुरुस्त आये, असं म्हणत माजी मुख्यमंत्री यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. ईव्हीएममुळे मी चार वेळा निवडून आले आहे. त्यामुळे मी ईव्हीएमला दोष देणार नाही, मी कसा संशय व्यक्त करू असं विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी का व्यक्त केला आहे, त्यावरून चव्हाण यांनी आज आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान हा टोला लगावला.नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातं आहे. ईव्हीएमच्या विषयावरून मविआचे नेते संताप व्यक्त करत आहेत. त्यातच गुरुवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या यांनी आपले मत व्यक्त करत मी चार वेळा ईव्हीएममुळे निवडून आले आहे. त्यामुळे कसा संशय व्यक्त करू, ईव्हीएम मशीन आणि मतदार यादीतील घोळामुळे संशयास्पद वातावरण निर्माण झालं आहे. या सर्वांचा अभ्यास केला पाहिजे असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्याबद्दल अशोक चव्हाण यांना विचारले असता, त्यांनी टोला लगावला. सुप्रिया सुळे यांना उशिरा शहाणपण सुचलं आहे. काही हरकत नाही देर आये दूर आये असं चव्हाण म्हणाले. परभणीचा विषय असो किंवा बीडची घटना असो. यामध्ये चौकशी लागली आहे. जे चौकशी दरम्यान स्पष्ट होईल त्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. बेछूट आरोप करू नये, असं आवाहन चव्हाण यांनी केलं.

मराठा आरक्षणाचा विषय सरकारने गांभीर्याने घेतलाय -

मराठा आरक्षणाचा विषय सरकारने गांभीर्याने घेतलाय, शासन स्तरावर मंत्रिमंडळ उपसमिती आहे, ती आढावा घेत आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. आता फडणवीस मुख्यमंत्री झालेत आता मज्जा येईल असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं होतं, त्यावर चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. नवीन सरकार आलं आहे, पाच वर्ष आहेत. सरकारने हा विषय जोमाने हाती घेतलेला आहे आणि तो मार्गी लागावा असा प्रयत्न आहे, असं चव्हाण म्हणाले.

नांदेडचा पालकमंत्री विकास कामं करणारा असावा

मंत्री मंडळाचा विस्तार झाला आहे. शिवाय खाते वाटप देखील झालं आहे, मात्र पालकमंत्रीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच पहायला मिळत आहे. नांदेडचा पालकमंत्री कोण होणार यावरून उत्सुकता लागली आहे. नांदेडचा पालकमंत्री विकासाची कामं करणारा असावा आणि नांदेडला जास्तीत जास्त वेळ देणारा पालकमंत्री असावा असं मतं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/8nLPwi3

No comments:

Post a Comment