इंदौर : इंदौरमध्ये सध्या भिकारी मुक्त अभियान सुरू आहे. यादरम्यान शुक्रवारी इंदौरमध्ये व्हीआयपी भिकारी पकडण्यात आले आहेत. महिला आणि बालविकास विभागाच्या पथकाने एमजी रोडवरील मशिदीजवळ एका महिला भिकाऱ्याला पकडलं असून त्याची तपासणी केली असता तिच्या बॅग आणि विविध पर्समधून तब्बल ४५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला नियमितपणे मशिदीजवळ भीक मागत होती आणि इथेच भीक मागून तिने मोठे पैसे जमवले. तिथेच एका पुरुष भीक मागणाऱ्या व्यक्तीलाही पकडण्यात आलं, त्याच्याकडून २० हजार रुपये वसूल करण्यात आले. तपासादरम्यान असं आढळून आले की, तो भीक मागणारा व्यक्ती ट्रेनमध्ये स्लीपर क्लासचं तिकीट काढून आंध्र प्रदेशातील कर्नूल येथून इंदौरला पोहोचला होता. त्याच्याकडे रेल्वेचा रिझर्वेशन फॉर्म आणि येण्या-जाण्याचं तिकिटंही सापडलं आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, देशातील इतर शहरांतील भिकारी इंदौरमध्ये येत त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत बनवत आहेत. पकडलेल्या पुरुष भिकाऱ्याकडे कुर्नूल ते भोपाळ आणि भोपाळ ते कर्नूल अशी तिकिटं सापडली. तो २ डिसेंबरला कुरनूलहून भोपाळमार्गे इंदौरला पोहोचला होता आणि त्याला २५ डिसेंबरला पुन्हा येण्याचं तिकीटही मिळालं होतं. पण इंदौरमध्ये चांगली कमाई असल्याने त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी सांगितलं, की भीक मागणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. भीक मागून उत्पन्न मिळवणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. भीक मागणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी सतत मोहिमा राबवल्या जात आहेत, मात्र इतर राज्यांतून येणाऱ्या भिकाऱ्यांचं इंदौरमध्ये येणं मोठं आव्हानात्मक ठरत आहे.दरम्यान, याआधीही इंदौरमध्ये एक श्रीमंत महिला भिकारी आढळली होता. तिने राजवाडा भागात भीक मागून ७५ हजार जमवले होते. तर तिथेच एका पुरुष भिकाऱ्याकडे २९ हजार सापडले होते. इंदौरमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे भिकारी योजनाबद्धरित्या इतर राज्यातून येऊन इंदौरमध्ये येतात आणि मोठी रक्कम जमा करुन भीक मागणं हेच त्यांच्या उत्पन्नाचं साधन ठरला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/uqdSt2D
No comments:
Post a Comment