Breaking

Sunday, December 22, 2024

Fact Check: बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार पाहून दुखावला, फखरुद्दीनने मुस्लीम धर्म सोडला? व्हायरल दावा खरा की खोटा? https://ift.tt/szI8u4A

नवी दिल्ली: शेख हसीना सरकार पाडल्यानंतर बांगलादेशात हिंदूंवर सुरू झालेले अमानुष अत्याचार अजूनही सुरूच आहे. जगभरातील अनेक मुस्लीम या घटनांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देताना दिसत आहेत. मात्र, बांगलादेशातील घटनेने दुखावलेल्या भारतातील एका मुस्लिमाने इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. हा दावा खरा आहे का? ते जाणून घेऊ

दावा काय आहे?

उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या फखरुद्दीन खान बांगलादेशातील हिंदूंवर मुस्लिमांकडून होत असलेल्या अत्याचाराने दुखावला गेल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. असा दावा केला जात आहे की फखरुद्दीनला त्याच्या पूर्वजांवर झालेल्या अत्याचाराची जाणीव झाली. त्याला हे कळालं की त्याच्या पूर्वजांनी कोणत्या स्तरावरील अत्याचार सहन केल्यानंतर हिंदू धर्म सोडून मुस्लीम धर्म स्वीकारला असेल. या जाणीवेने त्याला हिंदू बनण्याची प्रेरणा मिळाली.फखरुद्दीन खान हा सीतापूर जिल्ह्यातील अत्रिया पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी असल्याचे सोशल मीडियावर सांगण्यात आले आहे.शुद्धीकरणानंतर हवन करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य?

जेव्हा आम्ही या दाव्याची चौकशी सुरु केली तेव्हा आम्हाला सोशल मीडियावर सुदर्शन न्यूज आणि व्हीके न्यूजचे काही व्हिडिओ आढळले. सुदर्शन न्यूजने फखरुद्दीनच्या वक्तव्यासह हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.या संदर्भात अनेक नामांकित माध्यम संस्थांकडूनही बातम्या मिळाल्या. यामध्ये , , या संस्थांचा समावेश आहे. या सर्वांनी सांगितले की फखरुद्दीनने इस्लाम सोडला आहे आणि तो आता फतेह बहादूर सिंग बनला आहे.

निष्कर्ष:

फखरुद्दीनचा फतेह बहादूर सिंग झाल्याचा दावा अगदी बरोबर आहे. बांगलादेशातील मुस्लिमांकडून हिंदूंवर होणारे अमानुष अत्याचार पाहूनच फखरुद्दीनने इस्लाम सोडण्याचा निर्णय घेतला, हेही खरे आहे. सजगच्या तपासात हा दावा पूर्णपणे खरा असल्याचे आढळून आले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/zmt5PdW

No comments:

Post a Comment