भोपाळ : मध्यप्रदेशातून मन सुन्न करणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. पिकअप वाहनाने गाणे ऐकण्याच्या नादात ३ वर्षीय चिमुकल्याला वाहनानखाली चिरडले आहे. अपघात घडला त्याक्षणी वाहनचालकाने मोठ्या आवाजात म्युझिक सिस्टम लावले होते. त्यामुळे त्याला रस्त्यावरील लोकांचे आवाज ऐकू येत नव्हते. ज्यामध्ये चिमुकला चाकाखाली आला आणि त्याने जागीच प्राण गमावला. बलवारा पोलीस स्टेशनचे प्रभारी अनिल बामनिया यांच्या माहितीनुसार, पिकअप वाहनचालक आनंद याला आज ३ वर्षांच्या मुलाला वाहनाखाली चिरडल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी अर्जुन पिकअप वाहनातून कटकूट पोलीस ठाणे हद्दीतील बडेल गावात भाजीपाला उत्पादक मोहन यांच्या शेतात भाजी पुरवण्यासाठी गेला होता. भाजीचा साठा घेऊन पिकअप वाहन परतत असताना घरासमोर खेळत असलेला ३ वर्षीय आनंद त्याच्या कचाट्यात सापडला. आपल्या पोटच्या गोळ्याला गमावल्याने त्याच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आनंदच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, भाज्यांचे कॅरेट ठेवल्यानंतर वाहनचालक अर्जुनने पिकअपच्या म्युझिक सिस्टीमचा वाढवला. एवढ्यात तो आनंदच्या घराजवळ येताच लहान मुलं धोक्यात असल्याचे पाहून घरातील सदस्यांनी त्वरित आरडाओरडा सुरु केला. मात्र म्युझिक सिस्टीमचा आवाज मोठा असल्याने अर्जुनला त्यांचा आवाजच पोहोचला नाही आणि त्यामुळे आनंद चाकाखाली चिरडला गेला. ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. इतक्यात तो पिकअप घेऊन पळण्याच्या तयारीत होता मात्र लोकांनी पिकअप थांबवून तोडफोड केली. तरीही वाहनचालक अर्जुन घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. याआधीही भोपाळमध्ये मोठ्या आवाजामुळे एका मुलाला आपला जीव गमवावा लागला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/5mpNqAD
No comments:
Post a Comment