Breaking

Wednesday, December 4, 2024

कबड्डी : बालयोगी सदानंद अकादमी, आकाश स्पोर्टस् यांची कुमारी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक https://ift.tt/0Q9SUEk

मुंबई: बालयोगी सदानंद अकादमी, आकाश स्पोर्टस् यांनी मुंबई उपनगर कबड्डी असो. च्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पश्चिम विभागात उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. मुंबई उपनगरने संयोजन संस्था, चारकोप यांच्या सहकार्याने संचालिका नम्रता भोसले यांच्या सौजन्याने कांदिवली, सेक्टर - २ येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन केले आहे. कुमारी गटात बालयोगी सदानंदने ओम् नवमहाराष्ट्रचा ४१-०६ असा धुव्वा उडवीत आरामात उपांत्यपूर्व फेरी गाठली. मध्यांतराला २३-०३ अशी आघाडी घेणाऱ्या बालयोगीने नंतर देखील त्याच गतीने खेळत सामना सहज आपल्या नावे केला. भार्गवी व शुभश्री या म्हात्रे भगीनींच्या झंझावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. दुसऱ्या सामन्यात आकाश स्पोर्टस् ने अंजनी मंडळावर ३०-१७ अशी मात केली. पूर्वार्धात २२-०८ अशी आघाडी घेणाऱ्या आकाश संघाला उत्तरार्धात मात्र अंजनी मंडळाने चांगली लढत दिली. आकाशच्या विजयात पियुष्का शिंदे, धनश्री कोकरे यांनी चढाई पकडीचा उत्कृष्ट खेळ केला. अंजनीच्या प्राप्ती म्हात्रेने उत्तरार्धात बऱ्यापैकी लढत दिली. सागर मंडळाने कुमार गटाच्या चुरशीच्या सामन्यात राजा छत्रपती संघाचा प्रतिकार २६-२३ असा मोडून काढला. पहिल्या डावात पार्थ सादरे, सिद्धांत मोरे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या बळावर सागर संघाने १६-१० अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली. पण दुसऱ्या डावात सुर सापडलेल्या राजा छत्रपतीच्या गौतम राय, ब्रिजमोहन राय यांनी विजया करीता चांगलेच झुंजविले. शेवटी ३ गुणांनी सागर संघाने सामना आपल्या खिशात टाकला. नव जीवन मंडळाने ओम् भारत संघावर २८-१८ असा विजय मिळविला. विश्रांतीला १८-०९ अशी आघाडी विजयी संघाकडे होती. सुजल माईन, वेदांत भाताडे यांच्या अष्टपैलू खेळामुळे नव जीवनने हा विजय साकारला. ओम् भारतचा आकाश बने चमकला. छत्रपती मंडळाने बालवीर स्पोर्टस् चा ४१-०७ असा धुव्वा उडविला. छत्रपतीच्या आर्यन कुडतरकर, ज्योतिबा पाटील यांच्या झंझावाती खेळाला बालवीर संघाकडे उत्तरच नव्हते. हे तिन्ही सामने कुमार गटाचे होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/DZlzHxE

No comments:

Post a Comment