Breaking

Thursday, December 5, 2024

शरद पवारांच्या खास नेत्याने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, शपथविधी होताच वारं बदललं? https://ift.tt/3uqgZxI

मुंबई : देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत फडणवीसांनी महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधी पार पडताच त्यांनी मंत्रालयात मुख्यमंत्रीपदाचा पदभार देखील स्वीकारला आहे. यामुळे देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. राज्यातील सर्वपक्षीय नेते, भाजप नेते आणि पदाधिकारी तसेच दिग्गज मंडळींकडून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यातच फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी एक मोठा नेता सागर बंगल्यावर पोहोचला आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी दरम्यान भाजपच्या कमळाची साथ सोडून शरद पवारांची तुतारी हाती घेणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब सागर बंगल्यावर हजेरी लावली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या नव्या इंनिगसाठी शुभेच्छा दिल्या. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर हर्षवर्धन पाटील कुटूंबीयांसमवेत देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचले. यावेळी त्यांची लेक अंकित पाटील हिने फडणवीसांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा देखील दिल्या. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांना यंदा भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी कसरत करावी लागली. मात्र ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्याने त्यांची कोंडी झाली. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि तिकीटही मिळाले. पण त्यांना यंदाही सलग तिसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वत: शरद पवारांना फोन करुन शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र शरद पवारांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली. मविआचे बडे नेते देखील शपथविधीला हजर राहिले नाहीत. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढा मतदारंसघाचे आमदार अभिजीत पाटील शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. यातच आता भाजपवासी हर्षवर्धन पाटील यांनीही सहकुटुंब देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/4kVIfmh

No comments:

Post a Comment