Breaking

Sunday, December 29, 2024

भारताला पराभावची धूळ चारण्यासाठी स्टार्क सज्ज; टीम इंडियाला एका वाक्यात दिला इशारा https://ift.tt/4gwkqzn

मेलबर्न: भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया बाॅक्सिंग डे कसोटीचा सामना मेलबर्न येथे खेळवला जात आहे. मेलबर्न कसोटीचा आज शेवटचा दिवस असून ऑस्ट्रेलियाने भारताला ३४० धावांचे आव्हान दिले आहे. पाचव्या दिवशी भारत सामना खेळून जिंकते की हा सामना अर्निणित सुटतो याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहेत.ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आपल्या पाठीच्या दुखापतीबद्दलची चिंता दूर केली असून, भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी तो तंदुरुस्त आहे आणि गरज पडल्यास २० षटके टाकण्यास तयार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी असल्याचे समजते.रविवारी चौथ्या दिवसाच्या खेळानंतर स्टार्कने 'एबीसी नेटवर्क'ला सांगितले की, "आमच्याकडे उद्या ९८ षटके आहेत आणि हा सामना कसा पुढे जातो ते आम्ही पाहू. दुसऱ्या डावासाठी मी पूर्णपणे तयार आहे. मला त्रास देणारी गोष्ट नाही. मी अजूनही माझ्या पूर्ण गतीने गोलंदाजी करत आहे त्यामुळे मला कशाचीही चिंता नाही. उद्या मला २० (ओव्हर्स) टाकायची गरज पडली तर मी २० ओव्हर्स टाकेन."सामना बरोबरीत असून ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी एक दिवसाचा खेळ शिल्लक असताना नऊ विकेट्सवर ३४० धावांची आघाडी घेतली आहे. जेव्हा स्टार्कला विचारण्यात आले की ऑस्ट्रेलियाने विजयाच्या अधिक संधी मिळाव्यात म्हणून डाव घोषित करायला हवा होता, तेव्हा तो म्हणाला, '" तुम्ही (कर्णधार) पॅट कमिन्सला विचारले पाहिजे की... तुम्हाला त्याच्या विचारावर विश्वास ठेवावा लागेल."नितीश कुमार रेड्डीने भारतासाठी पहिल्या डावात ११४ धावांची धाडसी खेळी खेळली, त्यामुळे चौथ्या दिवशी संघाला पहिल्या डावात ३६९ धावा करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला १०५ धावांची आघाडी मिळाली. रेड्डीने १८९ चेंडूंच्या खेळीत ११ चौकार आणि एक षटकार ठोकला आणि भारतीय डावात बाद होणारा तो शेवटचा फलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स, स्कॉट बोलँड आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/y1WK6Fw

No comments:

Post a Comment