Breaking

Friday, December 20, 2024

विद्यार्थ्यांनी भरलेली बस, पण ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत; पोलिसांच्या सतर्कतेमुळे कुर्ला बस अपघाताची पुनरावृत्ती टळली https://ift.tt/gQ17cz8

प्रदिप भणगे, कल्याण : कुर्ला येथे बेस्ट बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले असता भीषण अपघात घडला होता. ज्यामध्ये अनेकांना प्राण गमावावे लागले. ही घटना ताजी असताना उल्हासनगरातून अशीच काही घटना समोर आली आहे. उल्हासनगरहून विरारच्या दिशेने निघालेल्या खाजगी बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत होता ज्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला. हे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्या बसला रोखून विद्यार्थ्यांचा जीव वाचवला आहे.घडले असे की, शुक्रवारी सायंकाळी एक खाजगी बस उल्हासनगर येथील जग्गू फुटबॉल अकॅडमीतील २६ लहान मुलांना घेऊन विद्यार्थ्यांना घेऊन उल्हासनगरहून विरारच्या दिशेने निघाली होती. ही बस वालधूनी पूल उतरून कल्याणच्या सुभाष चौकात आली. याठिकाणी खाजगी बसचा चालक बस वेडीवाकडी चालवित असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच ती बस रोखली आणि त्यांनी बस चालक सुरेंद्र प्रसाद गौतम यांची ब्रेथ अनालायझर टेस्ट केली. बसचा चालक मद्यधुंद असल्याने त्यांच्या ताब्यातील बस पोलिसांनी जप्त केली आणि बस चालकाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे २६ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. तर चालकाने दंड भरला असून त्याची बस त्याला परतवण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेश शीरसाट यांनी दिली आहे. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. वाहतूक पोलिसांनी बजावलेल्या कर्तव्य दक्षतेचे शहरात कौतूक होत आहे.

कुर्ला बस अपघाताची पुनरावृत्ती टळली

गेल्याच आठवड्यात कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर बेस्ट बसचा भीषण अपघात घडला होता. कुर्ल्याहून अंधेरी बसस्थानकाकडे जाणाऱ्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला होता. यामध्ये आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जखमी झाले होते. बस चालकाला योग्य प्रशिक्षण दिले नसल्याने हा अनर्थ घडला होता. बस चालक संजय मोरेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या पोलिसांच्या अटकेत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/iwI28Jf

No comments:

Post a Comment